लातुरातील १०० रुग्णालयांत आज माेफत आराेग्य शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:25 IST2021-08-14T04:25:00+5:302021-08-14T04:25:00+5:30
या शिबिरात जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी घालून दिलेल्या काेराेनाच्या नियमांचे पालन करूनच शिबिर घेतले जाणार आहे. एकावेळी ५० ...

लातुरातील १०० रुग्णालयांत आज माेफत आराेग्य शिबिर
या शिबिरात जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी घालून दिलेल्या काेराेनाच्या नियमांचे पालन करूनच शिबिर घेतले जाणार आहे. एकावेळी ५० पेक्षा अधिक रुग्णांची तपासणी हाेणार नाही. यासाठी नाेंदणी करणे आवश्यक आहे. माेफत तपासणी करण्यात येणार आहे. काही ठिकाणी एक्स-रे, साेनाेग्राफी, एमआरआय, लॅब तपासणीमध्ये ५० टक्के सलवत दिली जाणार आहे. लातूर शहरातील १०० रुग्णालयात हे माेफत आराेग्य तपासणी शिबिर घेण्यात येत आहे. यावेळी येणाऱ्या रुग्ण, नातेवाइकांना मास्क, सॅनिटायझर आणि साेशल डिस्टन्सिंगचे पालन करणे बंधनकारक आहे.
या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयएमएच्या अध्यक्षा डाॅ. सुरेखा काळे, सचिव डाॅ. हनुमंत किनीकर, संयाेजक डाॅ. अशाेक पाेद्दार, डाॅ. रमेश भराटे, डाॅ. कल्याण बरमदे, निमा हिमा आणि दंत वैद्यकीय विभागाचे जिल्हाध्यक्ष यांच्या वतीने देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.