सिद्धी शुगर येथे आरोग्य शिबिर, २३८ जणांची मोफत तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:19 IST2021-03-06T04:19:14+5:302021-03-06T04:19:14+5:30
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत जिल्हा परिषद व अंधोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने आयोजित शिबिराच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री बाळासाहेब ...

सिद्धी शुगर येथे आरोग्य शिबिर, २३८ जणांची मोफत तपासणी
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत जिल्हा परिषद व अंधोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने आयोजित शिबिराच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री बाळासाहेब जाधव होते. यावेळी सिद्धी शुगरचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश जाधव, व्हा. चेअरमन पी.जी. होनराव, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्तात्रय बिरादार, वैद्यकीय अधिकारी
डॉ. बाळासाहेब बयास, डॉ. सुरजमल सिंहाते, डॉ. अमृत चिवडे आदींची उपस्थिती होती.
या शिबिरात ऊसतोड कामगार, कर्मचाऱ्यांचा बी.पी., मधुमेहाची तपासणी करण्यात आली. तसेच कर्करोग, थायराॅईड, कावीळ, लिव्हर, किडणी, कोरोनाच्या तपासण्या मोफत करण्यात आल्या. कारखाना परिसरातील ऊसतोड कामगारांसह वडारवाडी, पेमातांडा, सांगवी तांडा, राळगा, तुळशीराम तांडा, उजना, राळगा तांडा आदी गावातील २३८ जणांनी शिबिराचा लाभ घेतला. यावेळी जनरल व फॅक्टरी मॅनेेजर बी.के. कावलगुडेकर, जनरल मॅनेजर (केन) पी.एल. मिटकर, जनरल मॅनेजर (डिस्टिलरी) एस.बी. शिंदे, चीफ अकौंटंट एल.आर. पाटील, सोमवंशी, ऊस विकास अधिकारी वाय.आर. टाळे, धनराज चव्हाण, दिलीपराव ताटे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. बाळासाहेब बयास यांनी केले. आभार पी.व्ही. दराडे यांनी मानले.