शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

पाच लाखांची लाच घेताना मुख्याधिकारी, नगररचनाकार जाळ्यात; रंगेहात पकडले

By राजकुमार जोंधळे | Updated: February 15, 2024 02:01 IST

याबाबत अहमदपूर पाेलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु हाेती.

राजकुमार जाेंधळे / अहमदपूर (जि. लातूर) : सात लाखांच्या लाचेची मागणी करुन, तडजाेडीअंती पाच लाखांची लाच स्वीकारणारा अहमदपूर नगरपारिषदेचा मुख्याधिकारी, नगररचनाकाराला रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई लातूर येथील एसीबीच्या पथकाने बुधवारी सायंकाळच्या सुमारास केली. याबाबत अहमदपूर पाेलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु हाेती.मरशिवणी (ता. अहमदपूर) येथील सर्व्हे नंबर ५६ मधील ३६०० चाै.मी. क्षेत्रास वाणिज्य प्रयाेजनार्थ जमीन विकासाची प्राथमिक परवानगी मिळाली असून, त्यात अंतिम परवानगी मिळण्यासाठी अहमदपूर नगर परिषद येथे दाखल प्रकरणात २५ ऑक्टाेंबर २०२३ राेजी तक्रारदाराने ऑनलाईन चलन भरले हाेते. दरम्यान, याबाबत लातूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संबंधिताने तक्रार केली. त्याची पडताळणी केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी सायंकाळी अहमदपूर नगरपरिषद येथे सापळा लावला. यावेळी तक्रारदाराच्या प्रलंबित कामासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नगररचनाकार अजय विजयकुमार कस्तुरे (वय ५५ रा. माेतीनगर, लातूर) आणि अहमदपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी काकासाहेब सिद्धेश्वर डाेईफाेडे (३९ रा. टेंभूर्णी राेड, अहमदपूर) यांना पाच लाखांची रक्कम स्वीकारताना एसीबीच्या पथकाने बुधवारी सायंकाळी रंगेहात पकडले. ही कारवाई अहमदपूर येथील नगरपरिषद येथे करण्यात आली. यावेळी एसीबीच्या पथकाने दाेघांनाही अटक केली असून, याबाबत अहमदपूर पाेलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू हाेती.

सात लाखांच्या लाचेची मागणी पण... -तक्रारदार प्रलंबित कामांसाठी ५ फेब्रुवारीला अहमदपूर येथील नगरपरिषद कार्यालय गेला हाेता. यावेळी सात लाख रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली. तडजाेडीअंती पाच लाख रुपये देण्याचे ठरले हाेते. दरम्यान, बुधवारी एसीबीने लावलेल्या सापळ्यात पाच लाखांची लाच घेताना दाेघेही अडकले. - भास्कर पुल्ली, पाेलिस निरीक्षक, एसीबी, लातूर 

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस