घराच्या व्हरांड्यात ठेवलेले तुरीचे कट्टे चोरीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:16 IST2021-04-03T04:16:29+5:302021-04-03T04:16:29+5:30
शहरातून दोन दुचाकींची चोरी लातूर : नांदेड रोडवरील गरुड चौकातील दुकानासमोर पार्किंग केलेल्या (एमएच २४ एसी १५४४) या दुचाकीची ...

घराच्या व्हरांड्यात ठेवलेले तुरीचे कट्टे चोरीला
शहरातून दोन दुचाकींची चोरी
लातूर : नांदेड रोडवरील गरुड चौकातील दुकानासमोर पार्किंग केलेल्या (एमएच २४ एसी १५४४) या दुचाकीची चोरी झाल्याची घटना घडली. याबाबत गुरुवारी जावेद बाबूमियाँ सय्यद (रा. शास्त्री नगर, लातूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास सपोफौ. परकोटे करत आहेत तर दुसरी घटना शिवाजी चौक परिसरात परिसरात घडली. विनोद बळवंत क्षीरसागर यांनी (एमएच २४ एबी ३८३९) या क्रमांकाची दुचाकी पार्किंग केली होती. अज्ञात चोरट्यांनी ती चोरली. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ. भताने करत आहेत.
तर तिसरी घटना उदगीर येथे घडली. रेड्डी कॉलनी देगलूर रोड येथील घरासमोर पार्किंग केलेल्या (एमएच २४ एई ७२५४) या क्रमांकाच्या दुचाकीची चोरी झाली. याबाबत सुनील ज्ञानोबा शिंदे (रा. करडखेल, ह.मु. रेड्डी कॉलनी देगलूर रोड उदगीर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद आहे.