हासेगावच्या फिजिओथेरेपीचा निकाल ९५ टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:20 IST2021-04-21T04:20:14+5:302021-04-21T04:20:14+5:30
प्रथम वर्षातील १२ विद्यार्थी विशेष प्रावीण्यात, १४ प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. द्वितीय वर्षातील ७ विशेष प्रावीण्यात, ...

हासेगावच्या फिजिओथेरेपीचा निकाल ९५ टक्के
प्रथम वर्षातील १२ विद्यार्थी विशेष प्रावीण्यात, १४ प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. द्वितीय वर्षातील ७ विशेष प्रावीण्यात, २ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. शरायू श्रीकांत मंदावकर ७१.०५ टक्के गुण घेऊन महाविद्यालयात प्रथम आली आहे. प्रियंका ताराचंद भिल ७१ टक्के गुण घेऊन द्वितीय आली आहे. द्वितीय वर्षातील प्रियंका राजीव गांधी ७१ टक्के गुण घेऊन महाविद्यालयात प्रथम आली. सुनिधी सुरेंद्र शिंदे ६७ टक्के घेऊन द्वितीय आली.
गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक श्री वेताळेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकरअप्पा बावगे, उपाध्यक्षा जयदेवी बावगे, सचिव वेताळेश्वर बावगे, कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे, प्राचार्य डॉ. विद्यासागर गाली, प्राचार्या शामलिला बावगे, प्राचार्य शेख कादर, प्राचार्य रबिक खान, प्राचार्या योगिता बावगे, मुख्याध्यापक कालिदास गोरे, मुख्याध्यापक आनंद शेंडगे, वाडीवाले, प्राचार्य सतीश गायकवाड आदींनी केले.