हसाळाची जिल्हा परिषदेची शाळा कोसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:14 IST2021-07-19T04:14:48+5:302021-07-19T04:14:48+5:30
दोन बालके जखमी : लातूर जिल्ह्यातील घटना लातूर : औसा तालुक्यातील हसाळा गावातील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचा काही भाग ...

हसाळाची जिल्हा परिषदेची शाळा कोसळली
दोन बालके जखमी : लातूर जिल्ह्यातील घटना
लातूर : औसा तालुक्यातील हसाळा गावातील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचा काही भाग रविवारी सकाळी, तर दुपारी साडेतीन वाजता संपूर्ण इमारतच कोसळली. यामध्ये सकाळच्या घटनेत शाळेला दरवाजा नसल्याने तिथे गेलेली दोन बालके जखमी झाली आहेत.
हसाळा येथे १५० मुलांची शाळा आहे. बालवाडी आणि पहिलीचे वर्ग चालविले जातात. सध्या कोरोनामुळे वर्ग भरत नाहीत. मात्र शाळेला दरवाजा नसल्याने रविवारी काही मुले तिथे खेळत गेली. दरम्यान, रविवारी सकाळी अचानक छताचा काही भाग पडल्याने रणजित अतुल पवार (वय ५ वर्षे) रामेश्वर बबनराव पाटील (५ वर्षे) हे दोघे जखमी झाले. त्यानंतर शाळेत कोणीच थांबले नाही. दुपारनंतर साडेतीनच्या सुमारास पूर्ण शाळा कोसळली. तिचे काहीजणांनी चित्रीकरण केले. कोरोनाने शाळा बंद असल्याने मोठा अनर्थ टळला असून हासाळा गावातील शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी कोरोना इष्टापत्ती ठरल्याची भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली.