समाजसेवेचे अवघड काम ‘रोटरी’कडून निष्ठेने सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:24 IST2021-09-14T04:24:20+5:302021-09-14T04:24:20+5:30
उदगीर येथील रघुकुल मंगल कार्यालयात रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रल व रोटरॅक्ट क्लब ऑफ उदगीरच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण ...

समाजसेवेचे अवघड काम ‘रोटरी’कडून निष्ठेने सुरू
उदगीर येथील रघुकुल मंगल कार्यालयात रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रल व रोटरॅक्ट क्लब ऑफ उदगीरच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण व शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते. मंचावर रोटरी डिस्ट्रिक्टचे प्रांतपाल डॉ. ओमप्रकाश मोतीपवळे, सहायक प्रांतपाल अनिल चवळे, ॲड. सविता मोतीपवळे, प्रमोद शेटकार, सचिव रवींद्र हसरगुंडे, अपेक्षा शेटकार, रोहिणी हसरगुंडे, सचिन पेन्सलवार, अभिजित विश्वनाथे उपस्थित होते. गहिनीनाथ महाराज औसेकर म्हणाले, संत तुकारामांनी सांगितलेल्या जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोचि साधू ओळखावा या उक्तीप्रमाणे रोटरी क्लब काम करत आहे. या क्लबचा आर्थिक व्यवहार हा अतिशय पारदर्शक असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले. ‘रोटरी’चे प्रांतपाल डॉ. ओमप्रकाश मोतीपवळे यांनी रोटरीच्या माध्यमातून श्री क्षेत्र पंढरपूर येथील चंद्रभागा नदीच्या स्वच्छतेची मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचे सांगितले. प्रास्ताविक विशाल तोंडचिरकर यांनी केले. कीर्ती कांबळे यांनी मागील वर्षाचा आढावा सादर केला.
यावेळी राजकुमार शिवशिवे, नामदेव चोले, छाया कुटेमाटे, महादेव विश्वनाथे, सुनंदा सरदार आदी शिक्षकांना राष्ट्राचे शिल्पकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचालन विशाल जैन व मंगला विश्वनाथे यांनी केले. आभार सचिव रवींद्र हसरगुंडे यांनी मानले. कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, रमेश आंबरखाने, मोतीलाल डोईजोडे, ॲड. एस. टी. पाटील, लक्ष्मीकांत सोनी, नंदकिशोर लोया, सोनू डगवाले, विजयकुमार बिरादार, शिवाजी पाटील आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.