हरंगुळ गाव रात्रभर अंधारात, नागरिक झाले हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:19 IST2021-04-02T04:19:43+5:302021-04-02T04:19:43+5:30

लातूर तालुक्यातील हरंगुळ बु. हे जवळपास १५ हजार लोकसंख्येचे गाव आहे. येथे महावितरणचे उपकेंद्र आहे. येथून १६ गावांना वीज ...

Harangul village was in darkness all night, citizens became harassed | हरंगुळ गाव रात्रभर अंधारात, नागरिक झाले हैराण

हरंगुळ गाव रात्रभर अंधारात, नागरिक झाले हैराण

लातूर तालुक्यातील हरंगुळ बु. हे जवळपास १५ हजार लोकसंख्येचे गाव आहे. येथे महावितरणचे उपकेंद्र आहे. येथून १६ गावांना वीज पुरवठा होतो. मात्र, दररोज विजेच्या लंपडावामुळे नागरिक हैराण झाले आहेत. आठ दिवसांपूर्वी भुयारी मार्गातील केबल तुटले आणि तब्बल १४ तास वीज खंडित झाली होती.

सध्या उन्हाचा पारा वाढत असल्याने अंगाची लाही- लाही होत आहे. दरम्यान, महावितरणच्या कर्मचाऱ्यांचा दिरंगाईमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बुधवारी रात्री ११ वा.च्या सुमारास उपकेंद्राजवळील बरड डीपीवरील केबल जळाले. हे केबल गुरुवारी सकाळी ९ वा. बदलण्यात आले. त्यामुळे नागरिकांना रात्रभर अंधारात रहावे लागले.

यासंदर्भात हरंगुळ सर्कलचे उपअभियंता बिराजदार यांनी कुठेतरी बिघाड झाला असावा असे म्हणत माहिती देण्यास टाळले. दरम्यान, येथील महावितरणचे कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने वेळेवर कामे होत नाहीत. त्यामुळे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

Web Title: Harangul village was in darkness all night, citizens became harassed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.