लातूरच्या रेणापूर नाका परिसरातील अतिक्रमणावर हातोडा

By हणमंत गायकवाड | Published: August 10, 2023 07:44 PM2023-08-10T19:44:07+5:302023-08-10T19:44:56+5:30

या चौकात गेल्या आठ दहा वर्षांपासून असलेले पानटपऱ्याची दुकाने हटविण्यात आली.

Hammer on encroachment in Renapur Naka area of Latur | लातूरच्या रेणापूर नाका परिसरातील अतिक्रमणावर हातोडा

लातूरच्या रेणापूर नाका परिसरातील अतिक्रमणावर हातोडा

googlenewsNext

लातूर: शहरातील रेणापूर नाका परिसरातील अहिल्यादेवी होळकर चौकामध्ये आठ ते दहा अतिक्रमणेलातूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने हटविले. जेसीबी द्वारे अतिक्रमण हटविण्यात आले. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांसह अन्य विभागातील कर्मचाऱ्यांचे सहकार्य घेण्यात आले.

अहिल्यादेवी होळकर चौक येथे गेल्या अनेक वर्षांपासून आठ ते दहा टपऱ्या फुटपाथवर थाटल्या होत्या. अतिक्रमणधारकाने स्वतःची जागा असल्यासारखे पान टपऱ्याची दुकाने केली होती. यामुळे रहदारीला अडथळा होत होता या चौकात नेहमीच वर्दळ असते आणि या वर्दळीच्या चौकात अतिक्रमणधारकाने फुटपाथ व्यापला होता. अतिक्रमण काढते वेळी, अतिक्रमण विभाग प्रमुख रवी कांबळे, वाहतूक पोलीस निरीक्षक गणेश कदम,     बाळासाहेब केंद्रे, किशोर कांबळे, दत्ता काळे, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे वाहतूक निरीक्षक सिद्धेश्वर रासुरे तसेच मुस्तफा शेख,आतिश गायकवाड,रजाक शेख,महिंद्र घोडके यांची उपस्थिती होती.

महिनाभरापूर्वी गंजगोलाईमध्ये अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली होती. त्यानंतर शहरातल्या मोठ्या रस्त्यावरही फुटपाथवर असलेले अतिक्रमण हटविण्यात आले. गुरुवारी महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाचा मोर्चा रेणापूर नाका चौकात वळला होता. या चौकात गेल्या आठ दहा वर्षांपासून असलेले पानटपऱ्याची दुकाने हटविण्यात आली. लातूर महानगरपालिका प्रशासन तसेच पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने अतिक्रमण हटविण्यात आले.

 

Web Title: Hammer on encroachment in Renapur Naka area of Latur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.