चाकुरात गटारी तुंबल्या; घाणीचे साम्राज्य़, डासाचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:18 IST2021-03-22T04:18:03+5:302021-03-22T04:18:03+5:30

चाकूर शहरातील रस्त्यावरील साफसफाई, नाल्याची सफाई करण्यासाठी घनकचरा व्यवस्थापना अंतर्गत लाखो रुपयांचा निधी खर्च केला जात आहे. शहरात एकूण ...

The gutters filled the wheel; Kingdom of Dirt, Infestation of Mosquitoes | चाकुरात गटारी तुंबल्या; घाणीचे साम्राज्य़, डासाचा प्रादुर्भाव

चाकुरात गटारी तुंबल्या; घाणीचे साम्राज्य़, डासाचा प्रादुर्भाव

चाकूर शहरातील रस्त्यावरील साफसफाई, नाल्याची सफाई करण्यासाठी घनकचरा व्यवस्थापना अंतर्गत लाखो रुपयांचा निधी खर्च केला जात आहे. शहरात एकूण १७ प्रभागांची रचना अआहे. मात्र, रस्त्यांची स्वच्छता, तुंबलेल्या गटारींची साफसफाइ वेळेवर केजी जात नाही. यातून नाल्या तुंबल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे. तर डासांचा प्रादुर्भावही वाढला आहे. चाकूर नगर पंचायतीवर सध्या प्रशासक आहे. नगरपंचायतीकडे घंटागाडींची संख्या मुबलक आहे. सफाई कामगारही आहेत. मात्र, साफसफाईची कामे करुन घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे. ‘स्वच्छ शहर...सुंदर शहर...’ हे कागदावरच आहे. चाकुरातील झरी रोड भागात सफाई,कचरा उचलून नेला जात नाही. परिणामी, या भागातील नागरिक खुल्या जागेत कचरा टाकून देत आहेत. घरोघर कचरा नेण्यासाठी घंटागाडी फिरकत नसल्याच्या तक्राीर आहेत. प्रभाग क्रमांक ९ मध्ये पंधरा दिवसापूर्वी साफसफाई करण्यात आली हाेती. या भागातील सर्वच नाल्या तुंबल्या आहेत. अशी परिस्थिती चाकुरात अनेक प्रभागात ठिकठिकानी पहायला मिळत आहे. सराफ लाईनमधील गटारी तुंबल्या आहेत. दररोज, साफसफाई होत नाही. गटारी तुंबल्याने व्यापाऱ्यांसह नागरिक त्रस्त झाले आहेत.

नगरपंचायतीने तातडीने हा प्रश्न सोडवावा....

चाकूर

नगरपंचायत दिवाबत्ती,घरपट्टी,नळपट्टी असे कर वसूल करत आहे. त्याप्रमाणे नागरिकांन सुविधा देण्यात यावे. कचरा नेण्यासाठी घंटागाडी शहरात फिरकत नाही. त्यामुळे लोक जमेल तेथे कचरा टाकून माेकळे हाेतात. चाकूर येथील गटारींची साफसफाई नियमितपणे करण्यात यावी. दररोज प्रत्येक प्रभागात घंटागाडी फिरावी, कचरा नेवून त्याची योग्यपणे व्हिलेवाट लावावी. अशी मागणी व्यापारी बालाजी पाशिमे, पांडुरंग बेजगमवार यांनी केली आहे.

चाकुरातील समस्या साेडवणार...

चाकूर शहरातील नागरिकांच्या या समस्या येत्या आठवडाभरात साेडविल्या जाणार आहेत. चाकुरातील सर्व गटारी तातडीने उपसल्या जाणार आहेत. प्रत्येक प्रभागात दरदिन घंटागाडी फिरणार आहे. स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांच्या तक्रारीची दखल घेतली जाइल. स्वच्छतेची सर्वच कामे केली जातील. त्याबाबत आपण नियाेजन केले आहे. असे चाकूर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे म्हणाले.

Web Title: The gutters filled the wheel; Kingdom of Dirt, Infestation of Mosquitoes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.