३४ लाख ७६ हजारांचा गुटखा जाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:20 IST2020-12-06T04:20:34+5:302020-12-06T04:20:34+5:30
अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक तथा पदावधित अधिकारी टी.सी. बोराळकर यांच्या सूचनेनुसार हे साहित्य जाळण्यात आले आहे. आरोग्यास ...

३४ लाख ७६ हजारांचा गुटखा जाळला
अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक तथा पदावधित अधिकारी टी.सी. बोराळकर यांच्या सूचनेनुसार हे साहित्य जाळण्यात आले आहे. आरोग्यास गुटखा, सुगंधित तंबाखू अपायकारक असल्याने राज्य शासनाने त्यावर प्रतिबंध घातला आहे. मात्र, शहरात काही ठिकाणी अवैधरित्या प्रतिबंधित गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखूची विक्री होत असल्याच्या माहितीवरुन अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाच्या मदतीने विविध ठिकाणी धाडी टाकून तो जप्त केला होता. हा साठा लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात ठेवण्यात आला होता. या प्रतिबंधित अन्न पदार्थाचे विश्लेषण अहवाल कार्यालयास प्राप्त झाले. त्या नमुन्यांमध्ये मॅग्नेशियम कार्बोनेट व निकोटीन हे मानवी आरोग्याला अपायकारक असलेले घटक आढळून आल्याचे अन्न विश्लेषकांनी घोषित केले होते. त्यामुळे सहाय्यक आयुक्त बोराळकर यांनी हा साठा नष्ट करण्याचे आदेश दिले. त्यानुसार ३४ लाख ७६ हजार ३२० रुपयांचा हा साठा शनिवारी जाळून नष्ट करण्यात आला. ही कार्यवाही लातूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश कदम, मोरील, पडिले, पोलीस नाईक विनायक पवार यांच्या सहकार्याने अन्न सुरक्षा अधिकारी दयानंद पाटील व अन्न सुरक्षा अधिकारी विठ्ठल लोंढे यांनी केली. त्यांना वाहन चालक मतीन यांनी मदत केली.
***