गुटख्याचा ट्रक उलटला, २७ लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:18 IST2021-04-13T04:18:55+5:302021-04-13T04:18:55+5:30

पाेलिसांनी सांगितले, औसा तालुक्यातील लामजना चौकातून औशाकडे येणारा ट्रक के.ए. ३८/ ६४८३ हा सोमवारी सकाळी फत्तेपूर ते दावतपूर या ...

Gutkha truck overturns, Rs 27 lakh seized | गुटख्याचा ट्रक उलटला, २७ लाखांचा मुद्देमाल जप्त

गुटख्याचा ट्रक उलटला, २७ लाखांचा मुद्देमाल जप्त

पाेलिसांनी सांगितले, औसा तालुक्यातील लामजना चौकातून औशाकडे येणारा ट्रक के.ए. ३८/ ६४८३ हा सोमवारी सकाळी फत्तेपूर ते दावतपूर या गावांच्यादरम्यान उलटल्याची घटना घडली. सदर ट्रकमध्ये लाखोंचा गुटखा भरलेला होता. ट्रक उलटल्यावर चालक घटनास्थळावरुन फरार झाला. तर बघ्यांनी गुटख्याच्या अनेक बॅगा लंपास केल्या. या घटनेची माहिती औसा पोलिसांना मिळताच,घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी लोकांच्या हातातला गुटखा परत घेत अपघातग्रस्त वाहनातील गुटखाही ताब्यात घेतला. हा गुटखा टेम्पो आणि छोटाहत्ती वाहनातून ठाण्यात आणण्यात आला आहे. जवळपास ८१ पोते गुटखा आणि पान मसाल्यासह एकूण २७ लाख ३६ हजार ५००रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

याबाबत औसा पाेलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Gutkha truck overturns, Rs 27 lakh seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.