कोपरा येथे गटविकास अधिकाऱ्यांनी घेतला आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:34 IST2021-02-06T04:34:31+5:302021-02-06T04:34:31+5:30
कोपरा ग्रामपंचायतीच्या वतीने गावामध्ये शासनाच्या विविध योजना राबविल्या जात आहेत. त्यात रमाई घरकुल योजना, बांधकाम पूर्ण झालेल्या घरामध्ये प्रत्यक्ष ...

कोपरा येथे गटविकास अधिकाऱ्यांनी घेतला आढावा
कोपरा ग्रामपंचायतीच्या वतीने गावामध्ये शासनाच्या विविध योजना राबविल्या जात आहेत. त्यात रमाई घरकुल योजना, बांधकाम पूर्ण झालेल्या घरामध्ये प्रत्यक्ष लाभार्थी राहतात की नाही, नवीन रमाई घरकुल बांधकामाची पाहाणी, मनरेगा माध्यमातून झालेल्या कामाची पाहणी, स्वच्छ भारत मिशनअंतर्गत बांधण्यात आलेल्या शौचालयाची पाहणी, स्वच्छता व पाणीपुरवठा, करवसुली, शिव रस्ता, पाणंद रस्ते आणि एमआरजीएसमार्फत विहीर घेणे आदी कामांचा त्यांनी आढावा घेतला. जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत राबविण्यात येत असलेल्या बाला उपक्रमाची पाहणी करून स्तुती केली.
तसेच गायरान आणि गावठाण जमिनीवर होत असलेले अतिक्रमण रोखणे, अतिक्रमण करणाऱ्यावर कडक पोलीस दंडात्मक कारवाई करणे, याबाबत त्यांनी सूचना केली. यावेळी सरपंच गंगाधर डेपे, उपसरपंच प्रा. बालाजी आचार्य, विस्तार अधिकारी डी.व्ही. सुडे, ग्रामसेवक रवींद्र क्षीरसागर, व्हाइस चेअरमन मधुकर सूर्यवंशी शिवाजी पिटाळे, अंगद गोरे, संतराम तरुडे, इंजि. राहुल कोराळे, इंजि. अनिल मिरकले, इंजि. शिवम फुलारी, स्थापत्य अभियंता विशाल भोसले, मुख्याध्यापक प्रल्हाद केंद्रे आदींची उपस्थिती होती.