कोविड लस घेतलेल्या व्यक्तींचा उदगीरात सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:20 IST2021-04-09T04:20:27+5:302021-04-09T04:20:27+5:30
यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, पंचायत समिती सभापती प्रा. डॉ. शिवाजीराव मुळे, शहराध्यक्ष समीर शेख, राष्ट्रवादी ...

कोविड लस घेतलेल्या व्यक्तींचा उदगीरात सत्कार
यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, पंचायत समिती सभापती प्रा. डॉ. शिवाजीराव मुळे, शहराध्यक्ष समीर शेख, राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर्स सेलचे सरचिटणीस डॉ. सुनील बनशेळकीकर, शहराध्यक्ष डॉ. भाग्यश्री घाळे, सचिव डॉ. विक्रम माने, वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय बिरादार, धन्वन्तरी आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दत्तात्रय पाटील, शफिभाई हाशमी, सामाजिक न्याय विभागाचे प्रदीप जोंधळे, प्रेम तोगरे, अजय शेटकार, बंटी आलमकेरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. कोविड लस ही पूर्णपणे सुरक्षित आहे. प्रत्येकाने लस घ्यवीच व तसेच लस घेतल्यानंतरही प्रत्येकाने खबरदारी घेणे आवश्यक आहे. शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून आपण व आपल्या कुटुंबाची सुरक्षा अबाधित ठेवावी, असे आवाहन डॉक्टर्स सेलच्या शहराध्यक्षा डॉ. भाग्यश्री घाळे यांनी केले. यावेळी लसीकरण केंद्रात काम करणारे डॉक्टर्स, नर्स व इतर आरोग्य कर्मचा-यांचाही सत्कार करण्यात आला.