राजीव गांधी यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:23 IST2021-08-22T04:23:30+5:302021-08-22T04:23:30+5:30
‘दयानंद’मध्ये सदभावना दिन लातूर : येथील दयानंद वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान, संगणक क्रांतीचे ...

राजीव गांधी यांना अभिवादन
‘दयानंद’मध्ये सदभावना दिन
लातूर : येथील दयानंद वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान, संगणक क्रांतीचे जनक राजीव गांधी यांचा जयंती दिवस सदभावना दिन म्हणून साजरा करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. राजाराम पवार होते. प्रारंभी राजीव गांधी यांच्या प्रतिमेस डॉ. राजाराम पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ. बाळासाहेब चव्हाण, डॉ. विशाल वर्मा, डॉ. मनीषा आष्टेकर, डॉ. साईनाथ उमाटे, डॉ. बालाजी कांबळे, प्रा. विठ्ठल जाधव, प्रा. शशिकांत स्वामी, प्रा. सुभाष मोरे, प्रा. श्रीकृष्ण जाधव, प्रा. दिपक वेदे, प्रा. दिपक माने, डॉ. ईश्वर बिदादा, कार्यालयीन अधीक्षक डी.एल. कातपुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. साईनाथ उमाटे यांनी प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी यांना सदभावना दिनाची शपथ दिली.
औसा तालुक्यात विविध उपक्रम
औसा : टायगर ग्रुपच्या वतीने औसा तालुक्याच्या ग्रामीण भागात विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नांदुर्गा येथील समता विद्यालयात विद्यार्थ्यांना सॅनिटायझर मास्क, वृक्षारोपण, सारणी जि.प.शाळेत वृक्ष भेट देण्यात आले. सारणी येथील ग्रामीण किसान सार्वजनिक वाचनालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ग्रंथपाल बस्वराज बिराजदार, परमेश्वर पाटील, परमेश्वर पाटील, सचिन साबणे, मनोज शिंदे, मोहन माने, मयूर गोरे, धीरज मोरे, किशोर मोरे, ऋषिकेश पाठवदकर, तुकाराम शिंदे, आकाश गुजकर, विशाल जाधव, अमर चव्हाण, बाळासाहेब जगताप, विशाल गायकवाड, विशाल मोरे, महेश पाटील, अभिषेक साबणे, अभिजीत मोरे, दादा साबणे, गणेश मोरे यांची उपस्थिती हाेती.