सामाजिक संस्थेतर्फे अभिवादन कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:16 IST2021-01-02T04:16:59+5:302021-01-02T04:16:59+5:30
मनपाच्या वतीने स्वच्छता मोहीम लातूर : शहर महापालिकेच्या वतीने शहरातील विविध भागांत स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. तसेच घंटागाडीद्वारे ...

सामाजिक संस्थेतर्फे अभिवादन कार्यक्रम
मनपाच्या वतीने स्वच्छता मोहीम
लातूर : शहर महापालिकेच्या वतीने शहरातील विविध भागांत स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. तसेच घंटागाडीद्वारे दुभाजकामधील कचरा संकलित केला जात आहे. सायंकाळी गंजगोलाई, बार्शी रोड, रेणापूर नाका, अंबाजोगाई रोड, औसा रोड आदी भागांतील रस्त्यांची स्वच्छता केली जात आहे.
रस्त्याची दुरवस्था; नागरिक त्रस्त
लातूर : शहरानजिक असलेल्या हरंगुळ नवीन वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त आहेत. पावसामुळे रस्ता खचला असून, किरकोळ अपघात घडत आहेत. अवजड वाहनांची रेलचेल असल्याने रस्ता दुरुस्तीची मागणी होत आहे.
बाजारात सोयाबीनची आवक वाढली
लातूर : शहरातील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढली आहे. यासोबतच गहू, ज्वारी, बाजरी, तूर, हरभरा, करडई, गुळ आदींची आवक होत आहे. नवीन वर्षानिमित्त अनेक शेतकरी आपला माल विक्रीस आणत आहेत.
ऊबदार कपडे खरेदीला पसंती
लातूर : जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला असून, ऊबदार कपडे खरेदीला नागरिकांची पसंती दिसून येत आहे. लातूर शहरातील गांधी चौक, औसा रोड, गंजगोलाई, दयानंद गेट परिसर, राजीव गांधी चौक परिसर आदी भागांत ऊबदार कपड्यांचे स्टॉल थाटले आहेत. गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात थंडी वाढली आहे.