कॉक्सिट महाविद्यालयात अभिवादन कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:23 IST2021-02-05T06:23:57+5:302021-02-05T06:23:57+5:30
महाराष्ट्र विद्यालयात संवाद उपक्रम लातूर : शहरातील महाराष्ट्र विद्यालयातील विद्यार्थ्यांशी संचालक अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी संवाद साधला. मास्क आणि ...

कॉक्सिट महाविद्यालयात अभिवादन कार्यक्रम
महाराष्ट्र विद्यालयात संवाद उपक्रम
लातूर : शहरातील महाराष्ट्र विद्यालयातील विद्यार्थ्यांशी संचालक अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी संवाद साधला. मास्क आणि सॅनिटायझर या साहित्याचा वापर विद्यार्थी काटेकोरपणे करावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी वैजनाथराव देशमुख, प्राचार्य गोविंद शिंदे, कमलाकर कदम, बाळासाहेब जाधव, उमेश इरपे आदींसह शिक्षक, कर्मचा-यांची उपस्थिती होती. दरम्यान महाराष्ट्र विद्यालयात कोरोना नियमांचे पालन करीत नियमित वर्ग घेतले जात आहेत.
पोदार जम्बो किड्स मध्ये क्रिडा दिवस
लातूर : येथील पोदार जम्बो किड्स मध्ये ऑनलाइन क्रिडा दिवस साजरा करण्यात आला. यावेळी प्राचार्य भारत भूषण झा, उपप्राचार्य अनिल साळवे, उपप्राचार्या रम्या तुतिका यांच्या मार्गदर्शनाखाली विविध स्पर्धा घेण्यात आल्या. कार्यक्रमात विद्यार्थ्यानी मार्च पास्ट, फिट आणि स्वस्थ व्यायाम, स्वच्छता- मुझे मुबारक, रस्सीखेच आदी स्पर्धा पार पडल्या. यावेळी मुख्याध्यापिका प्रतीक्षा अवस्थी, शिक्षिका अश्विनी झांबरे, सुषमा माने, सुरेखा रामसाने, सुष्मिता स्वामी आदींसह शिक्षकांची उपस्थिती होती.
दयानंद कला मध्ये हुतात्मा दिन साजरा
लातूर: येथील दयानंद कला महाविद्यालयामध्ये हुतात्मा दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ. एस.पी. गायकवाड, उपप्राचार्य अनिलकुमार माळी, पर्यवेक्षक डॉ. दिलीप नागरगोजे, डॉ. अंकुशकुमार चव्हाण, डॉ. रमेश पारवे, कार्यलयीन अधीक्षक नवनाथ भालेराव आदींसह महाविद्यालयातील प्राध्यापकांची उपस्थिती होती. यावेळी प्राचार्य डॉ. गायकवाड यांनी उपस्थितांना हुतात्मा दिनाबद्दल माहीती दिली.
शिवजागृती महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन
लातूर : नळेगाव येथील शिवजागृती महाविद्यालयात प्रजासत्ताक दिलन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. ओमशिवा लिगाडे, श्री स्वामी विवेकानंद विकास मंडळाचे अध्यक्ष बब्रुवान जाधव, विश्वनाथ सताळकर, बालाजी पेन्सलवार, डॉ. उमाकांत शेटे, पद्माकर बिराजदार, प्राचार्य डॉ. संजय वाघमारे आदींसह प्राध्यापकांची उपस्थिती होती. सुत्रसंचालन आणि आभार क्रीडा संचालक डॉ. कैलास पाळणे यांनी केले.
श्री केशवराज विद्यालयात पालक मेळावालातूर : शहरातील श्री केशवराज प्राथमिक विद्यालयात ऑनलाईन पालक मेळावा पार पडला. यावेळी शर्मिष्ठाताई कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, मुलांच्या आहारात फळे, कंदमूळे, पालेभाज्यांचा वापर वाढवला की आपले मूल कसल्याही रोगाचा प्रतिकार करू शकते. कार्यक्रमास रेखाताई मनूरकर, डॉ.संजीवनी शिरुरे, मुख्याध्यापक शिवाजी हेंडगे, सुर्यवंशी, देशपांडे यांची उपस्थिती होती.