बांधावर म्हशी चारण्यावरून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:21 IST2021-03-23T04:21:15+5:302021-03-23T04:21:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : शेतातील सामाईक बांधावर म्हशी का चारत आहेस असे म्हणत चौघांनी एकास शिवीगाळ करून काठीने ...

From grazing buffaloes on the dam | बांधावर म्हशी चारण्यावरून

बांधावर म्हशी चारण्यावरून

लोकमत न्यूज नेटवर्क

लातूर : शेतातील सामाईक बांधावर म्हशी का चारत आहेस असे म्हणत चौघांनी एकास शिवीगाळ करून काठीने डोक्यात मारून डोके फोडल्याची घटना साई शिवारात घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात रविवारी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी लक्ष्मण नागा मुळे (रा. साई, ता. लातूर) हे रविवारी शेतातील सामाईक बांधावर म्हशी चारत होते. तेव्हा गावातील बाजीराव चंद्रकांत मुळे व अन्य तिघांनी संगनमत केले. या चौघांनी तू या बांधावर म्हशी का चारत आहेस, असे म्हणून लक्ष्मण मुळे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तेव्हा तुम्ही शिवीगाळ का करता, असे म्हटले असता आरोपींनी हातातील काठीने मारून डोके फोडले. तसेच लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. जिवे मारण्याची धमकीही दिली. या प्रकरणी लक्ष्मण मुळे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हेड काॅन्स्टेबल वांगे हे करीत आहेत. दरम्यान, या घटनेप्रकरणी अद्याप कोणास अटक नसून, पोलीस अधिक तपास करीत असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: From grazing buffaloes on the dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.