नागरी सुविधांकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:24 IST2021-09-17T04:24:41+5:302021-09-17T04:24:41+5:30

स्वच्छतेसाठी दलित वस्तीमधील नागरिकांनी अनेकवेळा ग्रामपंचायतीला सुचना दिलेल्या आहेत. याकडे ग्रामपंचायतने दुर्लक्ष केल्याने एका १५ वर्षीय बालकाचा डेंग्यूने बळी ...

Gram Panchayat neglects civic amenities | नागरी सुविधांकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष

नागरी सुविधांकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष

स्वच्छतेसाठी दलित वस्तीमधील नागरिकांनी अनेकवेळा ग्रामपंचायतीला सुचना दिलेल्या आहेत. याकडे ग्रामपंचायतने दुर्लक्ष केल्याने एका १५ वर्षीय बालकाचा डेंग्यूने बळी घेतला आहे. त्यामुळे नागरीकांत चिंतेच वातावरण पसरले आहे. रेणापुर तालूक्यातील पानगाव तालूक्यातील मोठ्या बाजारपेठेचे गाव म्हणून ओळखले जात. या ठिकाणी बाजारपेठ मोठ्या प्रमाणात असून, याच गावावर बारा वाडी-खेड्याचा व्यवहार चालतो. या गावची ग्रामपंचायत ही १७ सदस्यीय आसल्याने तालूकास्तरीय म्हणून या गावची ओळख आहे. गावातल्या विकासासाठी आणि विशेषतः दलित वस्तीच्या विविध ठिकाणच्या विकासकामांसाठी लाखों रुपयांचा निधी पानगाव ग्रामपंचायतीला आला. पण आजही शिवाजी नगर, उल्हास नगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर या वस्तीच्या ठिकाणी नागरी सुविधांचा अभाव आहे. आजही नालीचा, रस्त्यावरील पाण्याचा आणि तुंबलेल्या नालीतील घाण पाण्याचा प्रश्न कायम आहे.

ग्रामपंचायतकडून धुर फवारणी मोहीम...

ग्रामपंचायतला धुर फवारणीसाठी जाग आली परंतू, डेंग्यू प्रतिबंधासाठी धुर फवारणी हा पर्याय नाही. ज्या ठिकाणी नाल्या तुंबलेल्या आहेत, रस्त्यावर घाण पाणी येते यांचा बंदोबस्त करणे हा पर्याय आहे. परंतू भर रस्त्यावर नालीचे घाण पाणी असतानाही केवळ धूर फवारणी करुन लोकांना ग्रामपंचायत काम करत असल्याचे दाखवत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने नाल्यांची स्वच्छता करावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Gram Panchayat neglects civic amenities