ममदापूर येथे ग्रा.पं सदस्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:23 IST2021-02-05T06:23:52+5:302021-02-05T06:23:52+5:30

किस सुभाष एकतारे यांचा दयानंदमध्ये सत्कार लातूर : शहरातील दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक सुभाष एकतारे व प्रयोगशाळा सहायक ...

G.P. members felicitated at Mamdapur | ममदापूर येथे ग्रा.पं सदस्यांचा सत्कार

ममदापूर येथे ग्रा.पं सदस्यांचा सत्कार

किस

सुभाष एकतारे यांचा दयानंदमध्ये सत्कार

लातूर : शहरातील दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक सुभाष एकतारे व प्रयोगशाळा सहायक ज्योती निमकर महाविद्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्य लिपिक संजय तिवारी, कनिष्ठ लघुलेखक बन्सी कांबळे, युनिट प्रमुख दिलीप राठोड, सचिव लक्ष्मीकांत जोशी, कोषाध्यक्ष संजय व्यास, सदस्य रामकिशन सलगर, सुनील खडबडे आदींसह महाविद्यालयाचे शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात व्याख्यान

लातूर : स्‍पर्धा परीक्षेच्‍या यशस्‍वीतेसाठी इतिहास विषय महत्त्वपूर्ण आहे, असे मत सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठातील इतिहास अभ्‍यास मंडळाचे चेअरमन डॉ. के.एम. अंबाडे यांनी येथे व्यक्त केले. महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाच्या वतीने आयोजित ऑनलाइन व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी प्राचार्य डॉ. सिद्रामप्‍पा डोंगरगे, इतिहास विभागप्रमुख डॉ. सदाशिव दंदे, कुंदन लोखंडे, डॉ. शाहूराज यादव आदींसह प्राध्यापक, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

बोकनगावच्या विजयी सदस्यांचा सत्कार

लातूर : तालुक्यातील बोकनगाव येथील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये विजयी उमेदवारांचा माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मधुकर पाटील, विजयकुमार शिंदे, बालाजी दाताळ, संभाजी दाताळ, बंडू शिंदे, किशोर दाताळ, अंत्येश्‍वर दाताळ, शामराव सूर्यवंशी, विलासराव सूर्यवंशी, दयानंद स्वामी, आत्माराम जाधव आदींची उपस्थिती होती.

समसापूर जि.प. शाळेत अभिवादन कार्यक्रम

लातूर : रेणापूर तालुक्यातील समसापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी जि.प. शिक्षण समितीचे सदस्य मंगेश सुवर्णकार, शिवनंदा पडलवार आदींसह शिक्षक, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. मंगेश सुवर्णकार यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जीवनकार्याविषयी माहिती दिली.

नीलकंठेश्वर विद्यालयात निरोप समारंभ

लातूर : शहरातील श्री नीलकंठेश्वर माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक के.के. पैके यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला. यावेळी मन्मथ येरटे, चौधरी, खानापुरे, शिक्षिका कल्याणी, नसके, आर.टी. सगर, गाडेकर, स्वामी आदींसह शिक्षकांची उपस्थिती होती. प्रारंभी, मुख्याध्यापक पैके यांचा शाळेतील शिक्षकांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

किसान कामगार समन्वय समितीची बैठक

लातूर : दिल्ली येथे गेल्या दोन महिन्यांपासून शेतकरी विरोधी कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्याआनुषंगाने आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी किसान कामगार समन्वय समिती लातूरच्या वतीने बुधवारी सायंकाळी ४ वाजता पत्रकार भवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. उपस्थितीचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: G.P. members felicitated at Mamdapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.