औसा शहर हद्दवाढीला शासनाकडून मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:20 IST2020-12-31T04:20:23+5:302020-12-31T04:20:23+5:30
औसा शहराची ही दुसरी हद्दवाढ आहे. सध्या शहराचे क्षेत्रफळ ५३२ हेक्टर चौरस किलोमीटर आहे. शहराच्या हद्दीबाहेर मोठ्या प्रमाणात नागरी ...

औसा शहर हद्दवाढीला शासनाकडून मंजुरी
औसा शहराची ही दुसरी हद्दवाढ आहे. सध्या शहराचे क्षेत्रफळ ५३२ हेक्टर चौरस किलोमीटर आहे. शहराच्या हद्दीबाहेर मोठ्या प्रमाणात नागरी वस्त्या, व्यापारी प्रतिष्ठाने, उद्योगधंद्यात वाढ झाली आहे. शहराच्या उत्तर आणि दक्षिण भागात मोठा विस्तार झाला आहे. तांत्रिक कारणामुळे या परिसरातील लोकांना मूलभूत सुविधा देण्यामध्ये नगर पालिकेस अडचणी येत होत्या. शिवाय, पालिकेचे आर्थिक नुकसानही होत होते. आता या भागाचा विकास करणे सोयीचे ठरणार आहे. हद्दवाढीमुळे शहराचे क्षेत्र ५८४ हेक्टर होणार आहे. त्याचबराेबर नगरपालिकेचा दर्जा आता ‘ब’ वर्ग होणार आहे. या भागात विकासकामे, मूलभूत सोयी-सुविधांसाठी शासनाने निधी मंजूर केला आहे. यातून शहराच्या विकासाला चालना मिळणार असल्याचे नगराध्यक्ष अफसर शेख म्हणाले.
पाठपुराव्याचा झाला फायदा...
औसा शहराची प्रलंबित असलेली हद्दवाढ मंजूर व्हावी, यासाठी नगराध्यक्ष शेख यांनी भाजप सरकारच्या काळात औरंगाबाद उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. दरम्यान, यावर न्यायालयाने हद्दवाढीबाबत लातूर जिल्हाधिकाऱ्यांकडे हद्दवाढीसंदर्भात प्राप्त हरकती आणि सूचनांच्या सुनावणीला स्थगिती दिली होती. हा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचे आदेश दिले होते. आता या हद्दवाढीला शासनाने मंजुरी दिली असून, पाठपुराव्याला यश आले आहे.
- डॉ. अफसर शेख, नगराध्यक्ष, औसा