अंधोरी येथे खेळाडू, प्रशिक्षकांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:15 IST2021-07-18T04:15:46+5:302021-07-18T04:15:46+5:30

प्रारंभी कबड्डी महर्षी शंकरराव उर्फ बुवा साळवी, सुभाष पलमटे, बाबूराव नलवाड यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. ...

The glory of the players and coaches at Andhori | अंधोरी येथे खेळाडू, प्रशिक्षकांचा गौरव

अंधोरी येथे खेळाडू, प्रशिक्षकांचा गौरव

प्रारंभी कबड्डी महर्षी शंकरराव उर्फ बुवा साळवी, सुभाष पलमटे, बाबूराव नलवाड यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी जिल्हा कबड्डी असो.चे सचिव प्रा. गणपतराव माने, राष्ट्रीय खेळाडू लक्ष्मण सारुळे, बापूराव सारुळे, माजी पोलीस उपनिरीक्षक धर्मपाल गायकवाड, दिनेश सूर्यवंशी, विश्वनाथ शिंगडे, प्रभाकर अंधोरीकर, मदन परगे, नामदेवराव सारुळे, राष्ट्रीय कबड्डी पंच संजय कांबळे, भीमसेन गायकवाड, आयुब शेख, गुणवंत बेंबडे, नितीन मामडगे, अमर कांबळे, पवन येलणारे, निकिता व्हत्ते, अंजली सावंत, श्रध्दा गायकवाड, अदिती बेंबडे उपस्थित होते.

याप्रसंगी गावातील माजी, आजी राष्ट्रीय खेळाडू, आदर्श खेळाडू, तरूण खेळाडू मुला, मुलींचा सत्कार करण्यात आला. तसेच त्रिमुख बने यांच्यासह कबड्डी प्रशिक्षक, मार्गदर्शकांचा सत्कार करण्यात आला.

यशस्वीतेसाठी सहशिक्षक शिंदे, बेले, उजळमकर, बिराजदार, बोडके, वाघमारे, विलासराव कासले, रेचवाड्ड यांनी परिश्रम घेतले. आभार बेले यांनी मानले.

Web Title: The glory of the players and coaches at Andhori

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.