उदगीरात कोविड योद्ध्यांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:14 IST2021-06-29T04:14:46+5:302021-06-29T04:14:46+5:30
उदगीर : येथील लालबहादूर शास्त्री शैक्षणिक संकुलाच्यावतीने सोमवारी कोविड योद्ध्यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक समन्वय समितीचे ...

उदगीरात कोविड योद्ध्यांचा गौरव
उदगीर : येथील लालबहादूर शास्त्री शैक्षणिक संकुलाच्यावतीने सोमवारी कोविड योद्ध्यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक समन्वय समितीचे अध्यक्ष मधुकर वट्टमवार होते. यावेळी माजी मुख्याध्यापक लक्ष्मीकांत नेलवाडकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. शशिकांत देशपांडे उपस्थित होते. स्थानिक समन्वय समितीचे कार्यवाह शंकरराव लासुणे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यानंतर वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. शशिकांत देशपांडे, डॉ. सुप्रिया विभुते, दत्तात्रय सोनटक्के, पोलीस नाईक रवींद्र चिमोले, अनुसया गोपे, राजू कटेवार, रमेश रुद्देवाड, उमाकांत गंडारे, सतीश सोनकांबळे यांचा कोविड योध्दा म्हणून गौरव करण्यात आला. एनटीएस परीक्षेतील गुणवंत यशश्री श्रीगिरे, अभिषेक पाटील, समर्थ पद्देवाड, श्रुती शिंदे यांचाही सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक मुख्याध्यापक प्रदीप कुलकर्णी, सूत्रसंचालन एकनाथ राऊत यांनी केले. देविदास राठोड यांनी आभार मानले. कार्यक्रमाला शालेय समितीचे अध्यक्ष व्यंकटराव गुरमे, डॉ. संजय कुलकर्णी, आदी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी अंबादास गायकवाड, माधव मठवाले, अनिता यलमटे, शरद पवार यांनी पुढाकार घेतला.