विक्रमी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:14 IST2021-07-02T04:14:41+5:302021-07-02T04:14:41+5:30

रेणापूर : कृषी विभागातर्फे हरित क्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन, कृषी संजीवनी मोहिमेचा समारोप ...

The glory of the farmers who took record production | विक्रमी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव

विक्रमी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव

रेणापूर : कृषी विभागातर्फे हरित क्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन, कृषी संजीवनी मोहिमेचा समारोप गुरुवारी करण्यात आला. तसेच रब्बी हंगामातील पीक स्पर्धेतील विक्रमी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

पंचायत समिती सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे उपसभापती अनंत चव्हाण होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य उद्धव चेपट, माजी सभापती अनिल भिसे, माधवराव चव्हाण, तालुका कृषी अधिकारी हरिराम नागरगोजे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी अशोक डमाले, मंडल कृषी अधिकारी संभाजी शेणवे, प्रमिला जंजिरे उपस्थित होते.

रब्बी हंगाम २०२०च्या स्पर्धेत ४४ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. हरभरा पिकात सिंधगावचे रवींद्र कुलकर्णी यांनी विभागस्तरावर तृतीय क्रमांक पटकावला. त्यांनी हेक्टरी ४७.८० क्विंटल उत्पन्न घेतले. जिल्हा स्तरावर रब्बी ज्वारीत यशवंतवाडीचे हनुमंत चव्हाण प्रथम आले असून, त्यांनी हेक्टरी ६७.५८ क्विंटल उत्पन्न घेतले. गहू पिकात पोहरेगावचे अनिल सरवदे यांनी हेक्टरी ६१.८४ क्विंटल उत्पन्न घेऊन व्दितीय क्रमांक मिळवला. हरभरा पिकात आरजखेड्याचे नागनाथ सूर्यवंशी यांनी हेक्टरी ४७.५० क्विंटल उत्पन्न घेऊन प्रथम क्रमांक मिळवला. गरसुळीचे सुशांत चव्‍हाण यांनी हेक्टरी ४७.२३ क्विंटल उत्पन्न घेऊन व्दितीय क्रमांक मिळवला.

तालुकास्तरावर रब्बी ज्वारी पिकात रेणापूरचे शिवाजीराव व्यवहारे यांनी हेक्टरी ५५.११ क्विंटल उत्पन्न घेऊन प्रथम, पाथरवाडीचे अमोल गुणाले यांनी हेक्टरी ४२.१० क्विंटल उत्पन्न घेऊन व्दितीय, टाकळगावचे गोपाळ कदम यांनी हेक्टरी ४० क्विंटल उत्पन्न घेऊन तृतीय क्रमांक मिळवला. गहू पिकात पोहरेगाव येथील कविता चेपट यांनी हेक्टरी ५८.२० क्विंटल उत्पन्न घेऊन प्रथम, शेरा येथील लिंबराज सोनवणे यांनी हेक्टरी ४९.३८ क्विंटल उत्पन्न घेऊन व्दितीय, धवेली येथील तुकाराम पुळकुटे यांनी हेक्टरी ४९.१९ क्विंटल उत्पन्न घेऊन तृतीय क्रमांक मिळवला.

हरभरा पिकात आजरखेडा येथील नारायण दळवे यांनी हेक्टरी ४३.५० क्विंटल उत्पन्न घेऊन प्रथम, जवळगा येथील सोमनाथ कोडे यांनी हेक्टरी ४१.८० क्विंटल उत्पन्न घेऊन व्दितीय, टाकळगाव येथील भगवान कदम यांनी हेक्टरी ४१.३६ क्विंटल उत्पन्न घेऊन तृतीय क्रमांक मिळवला.

प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी हरिराम नागरगोजे, सूत्रसंचालन संजय वाघमारे यांनी केले. आभार संभाजी शेणवे यांनी मानले.

010721\1924-img-20210701-wa0041.jpg

कृषी दिनानिमित्त रब्बी पीक हंगामा पीक स्पर्धा विजेता शेतकऱ्यांचा सन्मान करताना

Web Title: The glory of the farmers who took record production

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.