ओबीसीचा टक्का वाढवून मराठा समाजाला आरक्षण द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:34 IST2021-02-06T04:34:20+5:302021-02-06T04:34:20+5:30
ओबीसी समाज मराठा समाजासोबत... मराठा समाजाचे सर्वच समाज बांधवांसोबत सलोख्याचे संबंध आहेत. परंतु, काही स्वयंघोषित नेते समाजा-समाजात भांडणे लावतात. ...

ओबीसीचा टक्का वाढवून मराठा समाजाला आरक्षण द्या
ओबीसी समाज मराठा समाजासोबत...
मराठा समाजाचे सर्वच समाज बांधवांसोबत सलोख्याचे संबंध आहेत. परंतु, काही स्वयंघोषित नेते समाजा-समाजात भांडणे लावतात. मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वांनीच पाठिंबा दिलेला आहे. ओबीसी बांधवही मराठा समाजासोबत आहेत, असे जावळे-पाटील म्हणाले.
मेळाव्यास नानासाहेब जावळे-पाटील, विजयकुमार घाडगे-पाटील, भगवान माकणे, आप्पासाहेब कुढेकर, भीमराव मराठे, पंजाबराव काळे, संतोष जेधे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
-तर त्यांची हकालपट्टी करा...
सरकारचा मराठा समाजाला पाठिंबा असेल आणि कोणी दोन मंत्री विरोध करीत असतील तर त्यांची हकालपट्टी करा, अशी मागणी करीत जावळे-पाटील म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातील स्मारक लवकरात लवकर उभे राहिले पाहिजे.
मार्चमध्ये राज्यव्यापी आंदोलन...
आरक्षण द्या; अन्यथा मार्च महिन्यात राज्यव्यापी आंदोलन करू. मंत्रालयात घुसून लोकप्रतिनिधींचा समाचार घेऊ, असा इशारा देत जावळे-पाटील यांनी पंतप्रधानांना भेटणार असल्याचे सांगितले. दरम्यान, आरक्षणासाठी केंद्र आणि राज्य सरकार गंभीर नसल्याने समाजाचा रोष वाढत असल्याचे ते म्हणाले.