हुंड्यासाठी लातूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या पाेलीस ठाण्यांच्या हद्दीत जानेवारी ते डिसेंबर २०१८ मध्ये २१७ हुंड्यासाठी छळाच्या घटना घडल्या आहेत. २०१९ मध्ये २५३, २०२० मध्ये २२३ आणि २०२१ मध्ये १३५ हुंड्यासाठी विवाहितांच्या छळाच्या घटना घडल्याची नाेंद पाेलीस दप्तरी आहे. यामध्ये १८ महिलांचा हुंडाबळी गेला आहे. तर हुंड्यासाठी २१ महिलांचा खून करण्यात आला आहे.
अशिक्षितापासून उच्च शिक्षितांपर्यंत...
हुंडा मागणाऱ्यामध्ये समाजातील अशिक्षित आणि उच्चशिक्षित कुटुंबांचा माेठ्या प्रमाणात समावेश असल्याचे समाेर आले आहे. बहुतांश मुलांच्या कुटुंबांना हुंडा हवा आहे; मात्र त्याचे स्वरुप वेगवेगळे आहे. काेणाला व्यवसायासाठी भांडवल पाहिजे. तर काेणाला नाेकरीसाठी डाेनेशन म्हणून राेख पैसा हवा आहे. काहीना तर प्लाॅट, फ्लॅट, साेने, बंगला आणि गाडीच्या माध्यमातून भरमसाठ हुंडा हवा आहे. हुंड्याआडून मुलीच्या कुटुंबाकडे मागण्याची यादीच दिली जात असल्याचे समाेर आले आहे.
मुलींचे माता-पिताही जबाबदार...
समाजामध्ये शासकीय नाेकरी असणाऱ्या मुलाचा भाव सर्वाधिक आहे. अशा मुलांना माेठी मागणी असल्याने त्यांचे हुंड्याचे भावही वधारलेले असतात. अशावेळी शेती विकून मुलीसाठी नाेकरीचा जाेडीदार शाेधण्याची धडपड माता-पित्याची असते. हुंडा देण्यात मुलींच्या माता-पित्याची स्पर्धा असल्याचे दिसून येत आहे. तर नाेकरीचा जावई करण्यासाठी जीवाचे रान केले जात आहे.
- दीपा गीते, भराेसा सेल, लातूर
नवी पिढी बदलतेय...
जाेडीदार शाेधताना नव्या पिढीकडून हुंड्यापेक्षा उच्च शिक्षण, करियरला प्राधान्य दिले जात आहे. मेट्राे सिटीमध्ये आयटी सेक्टरमध्ये नाेकरी करणाऱ्या मुला-मुलींमध्ये हुंडा महत्त्वाचा राहिला नाही; मात्र जाेडीदार अनुरुप आणि समजदार असला पाहिजे, अशी अपेक्षा आहेत. यातून बदल घडत आहे.
- अमाेल उदगीरकर
उच्च शिक्षणात मुलींचा टक्का मुलांच्या बराेबरीने आहे. परिणामी, जाेडीदाराची निवड करताना शिक्षण, करियरला प्राधान्य दिले जात आहे. शासकीय नाेकरी हा मुद्दा खासगी सेक्टरमध्ये गाैण आहे. जीवन स्थिरस्थावर हाेण्यासाठी लागणाऱ्या बाबींना प्राधान्य दिले जात आहे. हाेतकरु मुलांना प्राधान्य दिले जात असल्याचे दिसून येत आहे. हा बदल नक्कीच स्वागतार्ह आहे.
- अविनाश वाढवणकर
हुंडा म्हणायचा की, पाेराचा लिलाव..?
१ साेयरिक करताना हुंड्याच्या नावाखाली पाेराचा लिलावच केला जात असल्याचे आता समाेर येत आहे.
२ हुंड्याच्या नावाखाली बंगला, गाडी, राेख पैसा, प्लाॅट, फ्लॅट आणि लग्न लावून देण्याची मागणी केली जात आहे.
३ हुंड्याच्या आडून माेठ्या प्रमाणावर व्यवहार करण्याकडे कल आहे. यातून मुलींकडून भरमसाठ पैसा-आडका वसूल करत पाेराचाच लिलाव केला जात आहे.