दिव्यांगाना अंत्योदय योजनेतून स्वतंत्र शिधापत्रिका द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:18 IST2021-04-06T04:18:37+5:302021-04-06T04:18:37+5:30
जळकोट तालुक्यातील दिव्यांगाची कोरोना काळानंतर परिस्थिती बिकट झालेली असून, दिव्यांगाना आपल्या अन्नपुरवठा योजनेतून अंत्योदय शिधापत्रिकाचा लाभ मिळत नाही. जळकोट ...

दिव्यांगाना अंत्योदय योजनेतून स्वतंत्र शिधापत्रिका द्या
जळकोट तालुक्यातील दिव्यांगाची कोरोना काळानंतर परिस्थिती बिकट झालेली असून, दिव्यांगाना आपल्या अन्नपुरवठा योजनेतून अंत्योदय शिधापत्रिकाचा लाभ मिळत नाही. जळकोट तालुक्यातील दिव्यांग बांधव या योजनेपासून वंचित राहत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या अन्ननागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या शासन आदेशानुसार, दिव्यांग व्यक्तींना अंत्योदय शिधापत्रिका कार्ड देताना प्राधान्य देण्यात यावे, असा आदेश आहे. असे असतानाही दिव्यांग कायदा-२०१६च्या दिव्यांग व्यक्तींना हक्क अधिनियम कायद्यानुसार दिव्यांग व्यक्तींना अंत्योदय अन्न शिधापत्रिका योजनेचा लाभ मिळणे गरजेचे आहे. तहसीलदारांनी जळकोट तालुक्यातील दिव्यांगाना तातडीने अंत्योदय शिधापत्रिका कार्ड वाटप करून, दिव्यांगाना अंत्योदय योजनेचा लाभ मिळवून द्यावा, असे निवेदन प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आले आहे. यावेळी प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेचे जळकोट तालुकाध्यक्ष माधव होणराव, तालुका उपाध्यक्ष नामदेव केंद्रे, ईश्वर पेटकर, दत्ता शिंदे, मारोती फुलारी, ओमकार टाले, विश्वनाथ शिंदे आदी उपस्थित होते.