दिल्लीच्या संस्थेकडून ८ ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर मशीन भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:14 IST2021-07-01T04:14:52+5:302021-07-01T04:14:52+5:30

लातूर जिल्ह्यात संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने कोविड-१९ रुग्णसंख्या आणि उपचारासाठी आवश्यक असलेला ऑक्सिजनचा पुरवठा लक्षात घेत सामाजिक बांधीलकीतून ...

Gift of 8 Oxygen Concentrator Machine from Delhi Institute | दिल्लीच्या संस्थेकडून ८ ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर मशीन भेट

दिल्लीच्या संस्थेकडून ८ ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर मशीन भेट

लातूर जिल्ह्यात संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने कोविड-१९ रुग्णसंख्या आणि उपचारासाठी आवश्यक असलेला ऑक्सिजनचा पुरवठा लक्षात घेत सामाजिक बांधीलकीतून मोफा टीम नवी दिल्ली या सेवाभावी संस्थेच्या वतीने ८ ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर या संस्थेला भेट देण्यात आली आहेत. या ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर उपलब्ध करून देण्यासाठी संस्थेच्या साक्षी भूषण, लातूर येथील रहिवासी अभिजित सोनटक्के यांनी प्रयत्न केले. त्याचबराेबर हे ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर उपलब्ध करून घेण्यासाठी संस्थेतील अजय कुदळे यांनी वेळोवेळी प्रयत्न केले आहेत. यावेळी उपअधिष्ठाता डॉ. मंगेश सेलूकर, प्राध्यापक, विभागप्रमुख, डॉ. अजय ओव्हाळ, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संतोषकुमार डोपे, अतिरिक्त वैद्यकीय अधीक्षक डॉ. महादेव बनसुडे, अजय कुदळे यांची उपस्थिती हाेती.

Web Title: Gift of 8 Oxygen Concentrator Machine from Delhi Institute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.