ज्ञानप्रबोधन संस्थेची सर्वसाधारण सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:18 IST2021-03-22T04:18:19+5:302021-03-22T04:18:19+5:30
रेणापूर येथील ज्ञानप्रबोधन शिक्षक कर्मचारी पतपुरवठा सहकारी संस्थेची सर्वसाधारण सभा झाली. सभेचे उद्घाटक म्हणून जिल्हा पतसंस्था संघाचे अध्यक्ष अशोक ...

ज्ञानप्रबोधन संस्थेची सर्वसाधारण सभा
रेणापूर येथील ज्ञानप्रबोधन शिक्षक कर्मचारी पतपुरवठा सहकारी संस्थेची सर्वसाधारण सभा झाली. सभेचे उद्घाटक म्हणून जिल्हा पतसंस्था संघाचे अध्यक्ष अशोक गोविंदपूरकर हे बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे चेअरमन सिद्धेश्वर मामडगे होते; तर प्रमुख पाहुणे म्हणून रेणुका शिक्षण संस्थेचे अध्यक्ष देविदास कुटवाड, सचिव ॲड. पंडित उगिले, सहसचिव तथा माजी सरपंच विठ्ठल कटके, श्रीराम विद्यालयाचे प्राचार्य बी. बी. कोल्हे, श्रीराम माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सतीश मोरे, पर्यवेक्षक गोडभरले, ‘रेणा’चे संचालक अनिल कुटवाड, पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन बालासाहेब सरवदे, सचिव राजाभाऊ करपे, संचालक आबाराव मोरे, संजीव बंडे, अरुण झाडपीडे, भरत संपते, दैवशाला चिटे, पुष्पा शेळके यांची उपस्थिती हाेती. चेअरमन सिद्धेश्वर मामडगे यांनी प्रास्ताविक केले. अमृतेश्वर स्वामी यांनी सूत्रसंचालन केले. आबाराव मोरे यांनी आभार मानले.