पन्नगेश्वर कारखान्याच्या सरव्यवस्थापकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:24 IST2021-02-05T06:24:52+5:302021-02-05T06:24:52+5:30

पाेलिसांनी सांगितले, रेणापूर तालुक्यातील पानगाव येथील पन्नगेश्वर साखर कारखान्याचे सरव्यवस्थापक दिलीप ग्यानबा बरुळे (वय ६५) हे सोमवार, १ फेब्रुवारी ...

General manager of Pannageshwar factory beaten | पन्नगेश्वर कारखान्याच्या सरव्यवस्थापकास मारहाण

पन्नगेश्वर कारखान्याच्या सरव्यवस्थापकास मारहाण

पाेलिसांनी सांगितले, रेणापूर तालुक्यातील पानगाव येथील पन्नगेश्वर साखर कारखान्याचे सरव्यवस्थापक दिलीप ग्यानबा बरुळे (वय ६५) हे सोमवार, १ फेब्रुवारी रोजी दुपारी ४.४० वाजण्याच्या सुमारास साखर कारखान्याच्या कार्यालयात बसले हाेते. दरम्यान, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे थकीत बिल आणि कारखाना कर्मचाऱ्यांच्या थकीत पगाराबाबतचे निवेदन स्वीकारून आठ दिवसांत निर्णय घेऊ असे सांगितले असता, मनसे कार्यकर्ते आणि सरव्यवस्थापक यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. यावेळी मनसेच्या पाचजणांनी सरव्यवस्थापकास मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारत म्हटल आहे. याबाबत रेणापूर पाेलीस ठाण्यात पन्नगेश्वरचे सरव्यवस्थापक दिलीप बरुळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून, महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे प्रदेश अध्यक्ष संतोष नागरगोजे, चेतन चव्हाण, अविनाश वाघमारे, विशाल भिसे यांच्यासह अन्य एकाविरुद्ध गु.र .नं ५२/२१ कलम १४३, १४७, १४९, ३२३, ५०४, ५०६, भा.दं.वि.प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास रेणापूरचे पोलीस उपनिरीक्षक सावळे करीत आहेत.

Web Title: General manager of Pannageshwar factory beaten

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.