शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

राज्यभरात धुमाकूळ घालणाऱ्या टोळीतील चौघांच्या मुसक्या आवळल्या; ५३ लाखांचा मुद्देमाल जप्त

By राजकुमार जोंधळे | Updated: August 18, 2022 19:13 IST

अटकेतील एका एका सराईत गुन्हेगारांवर विविध पोलीस ठाण्यात  २४ ते ३० गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.

लातूर : औरंगाबाद, बीड, नांदेड, यवतमाळसह लातूर जिल्ह्यात धुमाकूळ घालत घर, दुकान फोडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास करणाऱ्या अट्टल दरोडेखोरांच्या टोळीतील चार जणांच्या मुसक्या लातूर पोलिसांनी मोठ्या शिताफीने गुरुवारी आवळल्या आहेत. दरम्यान, गुन्ह्यातील कार आणि ५३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

लातुरातील श्रीनिकेतन सोसायटीतील आदित्य शिरीष बांडेवार (३१) यांचे रो-हाऊस १० जुलै रोजी रात्री ८ वाजता फोडले. रोख ५ लाख, चांदीचे भांडे, सोन्याचे दागिने असा एकूण २३ लाख ५ हजाराचा ऐवज चोरट्याने पळविला. याबाबत विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, या घरगोडीच्या तपासासाठी विविध पथके नियुक्त करण्यात आली होती. शिवाय, स्थानिक गुन्हे शाखेनेही समांतर तपास सुरु केला होता. स्थागुशाच्या पथकाने लखन उर्फ अमरदीप दशरथ जोगदंड (२९), किशोर उर्फ पपू काशिनाथ जोगदंड (३९) आणि प्रवीण उर्फ डॉन्या चंद्रकांत माने (३१) यांना अटक केली. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्यांची आणि साथीदारांची माहिती दिली. या तीन आरोपीकडूनगुन्ह्यात वापरलेली कार, रोख रक्कम असा १४ लाख ४० हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.  

नांदेड-यवतमाळ सीमेवर सापळा...गुन्ह्यातील अट्टल आरोपी हे नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथून यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड, महागाव, पोफळी हद्दीत असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली. या भागात सापळा लावत सूर्यकांत उर्फ सुरेश उर्फ दादा श्रीराम उर्फ राम मुळे ( ३४), अविनाश शंकर देवकर (२९), सुरेश उर्फ सूर्यकांत रामकिसन गंगणे (३८) आणि सूदर्शन उर्फ सोन्या विठ्ठलराव माने (२३) यांच्या सिनेस्टाईल पाठलाग करत मुसक्या आवळल्या.  असे अप्पर पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी सांगितले. 

१३ गुन्ह्याचा झाला  उलगडा...लातुरातील विवेकानंद चौक ८, एमआयडीसी २, शिवाजी नगर १, नांदेड जिल्ह्यातील भोकर १, अंबाजोगाई १अशा १३ गुन्ह्याचा उलगडा झाला आहे. 

सराईत गुन्हेगारांवर मोक्का कारवाई...अटकेतील एका एका सराईत गुन्हेगारांवर विविध पोलीस ठाण्यात  २४ ते ३० गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. सुरेश मुळे याच्याविरोधात औरंगाबाद, बीड जिल्ह्यात मोक्काअंतर्गत कारवाई झाली असून, त्याच्यावर २४ गुन्हे दाखल आहेत. तर सूर्यकांत गंगणे याच्याविरुद्ध बीड जिल्ह्यात मोक्का कारवाई केली असून, ५गुन्हे दाखल आहेत. अविनाश देवकर याच्याविरुद्ध विविध जिल्ह्यात १८ गुन्हे, लखन जोगदंड याच्यावर ३० गुन्हे आणि प्रवीण उर्फ डॉन्या याच्यावर १२ गुन्हे दाखल आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसlaturलातूर