शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

लातुरात मनसेची गांधीगिरी; काळ्या फिती बांधून मनपाचा निषेध करत राबवले स्वच्छता अभियान

By हणमंत गायकवाड | Updated: October 4, 2023 12:19 IST

शहर स्वच्छता न केल्यास मनपात कचरा टाकणार

लातूर : महात्मा गांधी जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘’एक तास स्वच्छतेसाठी खास’’ असा देशाला आणि प्रशासनाला संदेश दिला होताः त्याचे औचित्य साधून एक तारीख एक तास या उपक्रमात लातूर महापालिकेचे अधिकारी, पुढारी चमकोगिरी करीत असल्याचे दिसून आले. शहरात ठीक ठिकाणी कचऱ्याचे ढिग आहेत. तिथे जाऊन जर एक तास स्वच्छता केली असती तर शहर स्वच्छ झाले असते, अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मनपा प्रशासनाचा निषेध नोंदवीत गांधीगिरी स्टाईलने मंगळवारी स्वच्छता अभियान राबविले. ज्या ठिकाणी कचरा नाही,अशा ठिकाणी झाडतानाचे फोटो काढल्याचा निषेध मनसेने केला.

शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग दिसले नाहीत का?लातूर शहरात जागोजागी कचऱ्याचे ढिगारे पडले आहेत. संपूर्ण राज्यात डेंग्यूने थैमान घातले आहे. लातूर शहरातील कचऱ्याचे ढीग किमान गांधी जयंतीच्या दिवशी काढले असते तर लातूरकरांना समाधान वाटले असते. परंतु प्रशासनाने पंतप्रधानांनी आवाहन करूनही स्वच्छता मोहीम यशस्वीपणे राबवली नाही. महापालिकेला व चमकोगिरी करून झाडलोटीचे फोटो काढणाऱ्या नेत्यांना स्वच्छता मोहीम कशी असते हे दाखवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस संतोष नागरगोजे शहराध्यक्ष मनोज अभंग यांच्या नेतृत्वाखाली दंडाला कळ्या किती बांधून प्रशासनाचा निषेध केला. खरी खरी स्वच्छता मोहीम कन्हेरी रोड,मोती नगर लातूर या ठिकाणी राबविण्यात आली.

शहर स्वच्छता न केल्यास मनपात कचरा टाकणारयावेळी संतोष नागरगोजे यांनी शहर महापालिकेने दोन दिवसात स्वच्छता मोहीम राबवून जर कचऱ्याचे ढीग नाही उचलले तर मनसे स्वच्छता मोहीम राबवून कचरा महापालिकेत आणून टाकेल, असा इशारा दिला आहे. आंदोलनात मनसेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राठोड, शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष भागवत शिंदे, मनोज अभंगे, रवी सूर्यवंशी, रणवीर उमाटे, अंकुश शिंदे, अजय कलशेट्टी, जहांगीर शेख, अनिल जाधव,धनंजय मुंडे, गणेश पवार, आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

टॅग्स :laturलातूरMNSमनसे