कमालपुरात किराणा दुकानातील जुगारावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:21 IST2021-09-19T04:21:00+5:302021-09-19T04:21:00+5:30

पाेलिसांनी सांगितले, औसा तालुक्यातील काही गावामध्ये सध्याला अवैध व्यवसायाला माेठ्या प्रमाणावर पेव फुटले आहे. परिणामी, या व्यवसायाविराेधात पाेलिसांनी माेहीम ...

Gambling at a grocery store in Kamalpur | कमालपुरात किराणा दुकानातील जुगारावर छापा

कमालपुरात किराणा दुकानातील जुगारावर छापा

पाेलिसांनी सांगितले, औसा तालुक्यातील काही गावामध्ये सध्याला अवैध व्यवसायाला माेठ्या प्रमाणावर पेव फुटले आहे. परिणामी, या व्यवसायाविराेधात पाेलिसांनी माेहीम सुरु केली आहे. दरम्यान, औसा ते तुळजापूर महामार्गावर कमालपूर येथील एका दुकानामध्ये जुगार सुरु असल्याची माहिती १६ सप्टेंबर राेजी सहायक पाेलीस निरीक्षक विलास नवले यांच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे पाेलीस पथकाने किराणा दुकानावर छापा मारला. यावेळी गाेविंद गिरी, संभाजी थाेरे, दीपक थाेरे, रामेश्वर मारवडकर, भागवत गिरी यांना जुगार खेळताना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून राेख रक्कमेसह जुगाराचे साहित्य असा एकूण २० हजार ३४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत भादा पाेलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन पाच जणांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपाेनि. विलास नवले करीत आहेत.

Web Title: Gambling at a grocery store in Kamalpur