हातात तलवार घेऊन सोशल मिडियावर फाेटो टाकणारा गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:20 IST2021-04-04T04:20:11+5:302021-04-04T04:20:11+5:30
फेसबुकवर एक आक्षेपार्ह पोस्ट दिसून आली. त्यामध्ये एक ३५ वर्षीय तरूण हातामध्ये उघडी तलवार घेऊन उभा आहे. त्यावर पोलीस ...

हातात तलवार घेऊन सोशल मिडियावर फाेटो टाकणारा गजाआड
फेसबुकवर एक आक्षेपार्ह पोस्ट दिसून आली. त्यामध्ये एक ३५ वर्षीय तरूण हातामध्ये उघडी तलवार घेऊन उभा आहे. त्यावर पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे व त्यांच्या पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या तरूणाचा शोध घेतला असता सदरील तरूण लातूर शहरातील गवळी नगर भागातील रविंद्रकुमार सुभाष अर्जुने (३५) असल्याचे निष्पन्न झाले. पाेलिसांनी शनिवारी त्याला अटक केली असून त्याच्याकडून फेसबुकवर टाकण्यात आलेल्या फोटोत असलेली तलवारही जप्त करण्यात आली आहे.
याप्रकरणी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस अंमलदार यशपाल कांबळे यांच्या फिर्यादीवरून विवेकांनद चौक पोलीस ठाण्यात देण्यात आलेल्या तक्रारीवरून रविंद्रकुमार सुभाष अर्जुने याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कामगिरीत स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस अंमलदार रवी गोंदकर, खुर्रम काझी, यशपाल कांबळे यांचा सहभाग होता.