शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

असाही संताप... स्मशानभूमी नसल्याने ग्रामपंचायतीसमोरच अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2022 07:38 IST

हणमंतवाडीतील घटना : २० वर्षांपासून स्मशानभूमीच्या जागेची मागणी

निलंगा (जि. लातूर) : १५ ते २० वर्षांपासून स्मशानभूमीला शासनाकडून जागा मिळत नसल्याने संतप्त नागरिकांनी मृत महिलेवर ग्रामपंचायतीसमोरच अंत्यसंस्कार केले. हणमंतवाडी अं. बु. (ता. निलंगा) येथे गुरुवारी हा प्रकार घडला. हणमंतवाडी येथील ग्रामस्थ २० वर्षांपासून स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी प्रशासनाकडे करत आहेत; मात्र अद्याप स्मशानभूमीचा प्रश्न संपुष्टात आला नाही. येथील जागेचा वाद न्यायप्रविष्ट असल्याने गावातील मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करायचे कुठे, असा प्रश्न आहे. दरम्यान, सोजरबाई रामचंद्र निकम (७०) यांचे गुरुवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर थेट ग्रामपंचायतीसमोरच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय  ग्रामस्थांनी घेतला आणि ठरल्यानुसार ग्रामपंचायत कार्यालयासमोर चिता रचून पेटविली आणि अंत्यसंस्कार केले. 

अंबुलगा तलावानजीक जागा उपलब्ध...nसार्वजनिक स्मशानभूमीसाठी १९८५ मध्ये २० गुंठे जमीन अधिग्रहित करण्यात आली होती; परंतु त्या जमिनीची विक्री करण्यात आली आहे. दरम्यान, खरेदीदाराने न्यायालयातून मनाई हुकूम आणला आहे. ग्रामसेवक, तलाठ्यांनी गावाजवळील अंबुलगा तलावाजवळ अंत्यविधी करण्यास जागा उपलब्ध करून दिली आहे; मात्र काही नागरिकांनी ग्रामपंचायतीसमोर अंत्यविधी करून अतिरेक केला आहे, असे तहसीलदार गणेश जाधव म्हणाले.

स्मशानभूमीच्या जागेचा वाद न्यायालयात...सार्वजनिक स्मशानभूमीसाठी चार गुंठे जागा गावाने खरेदी केली होती; परंतु संबंधित शेतमालकाने ती जागा गावातील एकास विक्री केली. विक्री करणारा आणि खरेदी करणारा हे दोघेही जागा देण्यास तयार नाहीत. त्यामुळे ग्रामपंचायतीने न्यायालयात धाव घेतली आहे. स्मशानभूमी तयार करण्यासाठी ग्रामपंचायतीने वारंवार पाठपुरावा केला; मात्र शासन अंत्यविधीसाठी जागा देत नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ लक्ष देऊन जागा उपलब्ध करून द्यावी,अशी मागणी केली आहे.- प्रभाकर मलिले, सरपंच

 

टॅग्स :Deathमृत्यूgram panchayatग्राम पंचायत