जळकोट शहराची लोकसंख्या वाढत आहे. दरम्यान, वाढीव वस्तीत विद्युत खांब उभारण्यासाठी तसेच शहरात विद्युत दिवे बसविण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी नगरसेवक महेश धुळशेट्टे यांनी पालकमंत्री अमित देशमुख व राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. शहरात नगरपंचायत अस्तित्वात आल्याने वाढीव वस्त्या वाढल्या आहेत. तिथे विद्युत सुविधा उपलब्ध व्हावे म्हणून पालकमंत्री अमित देशमुख व राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी शहरातील विद्युत दिव्यांसाठी २ लाख ८८ हजारांचा निधी मंजूर केला आहे. जिल्हा नियोजन समितीमधून सदरचा निधी मंजूर झाला असून त्याच्या मंजुरीचे आदेश ३१ मार्च रोजी प्राप्त झाले आहेत. लवकरच या कामाला सुरुवात करण्यात येईल, असे नगरसेवक महेश धुळशेट्टे यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दस्तगीर शेख, संग्राम कदम, माजीद अन्सारी, माधव धुळशेट्टे आदी उपस्थित होते.
जळकोटातील विविध विकास कामांसाठी निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:16 IST