अहमदपूरच्या व्यापारी संकुलासह रस्त्यांसाठी अडीच कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:20 IST2021-05-07T04:20:38+5:302021-05-07T04:20:38+5:30
नगरविकास खात्याकडून अहमदपुर नगर परिषदेसाठी विशेष योजनेअंतर्गत (ठोक)अडीच कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून, यात नगर परिषद ईदगाह उत्तर ...

अहमदपूरच्या व्यापारी संकुलासह रस्त्यांसाठी अडीच कोटींचा निधी
नगरविकास खात्याकडून अहमदपुर नगर परिषदेसाठी विशेष योजनेअंतर्गत (ठोक)अडीच कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून, यात नगर परिषद ईदगाह उत्तर बाजू संरक्षण भिंत व सुशोभिकरण करण्यासाठी ९० लाख, शहरातील वैभव लॉज ते गुनाई रूग्णालयांपर्यंतचा सिमेंट रस्ता ५५ लाख, गिताई नगर ते फुलसे यांचे घर पुढे सांगवीकर यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता १५ लाख, बँक कॉलनीत रस्ता व नाली बांधकाम, त्रिवेणी नगर, चामे नगर, मिरकले नगर भागातील रस्त्यांसाठी निधी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे या भागातील रस्ते सिमेंटचे होणार असून काही ठिकाणी नाली बांधकामही होणार आहे. सदरील निधी मंजूर करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पावर, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकार्य केल्याबद्दल आमदार बाबासाहेब पाटील यांनी यावेळी आभार व्यक्त केले.