वाढवणा रुग्णालयासाठी १४ काेटी २७ लाखांचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:18 IST2021-03-28T04:18:47+5:302021-03-28T04:18:47+5:30
लातूर जिल्ह्यातील औराद शहाजानी, शिरुर अनंतपाळ आणि वाढवणा येथील प्राथमिक आराेग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करण्याचा निर्णय एकाचवेळी झाला ...

वाढवणा रुग्णालयासाठी १४ काेटी २७ लाखांचा निधी
लातूर जिल्ह्यातील औराद शहाजानी, शिरुर अनंतपाळ आणि वाढवणा येथील प्राथमिक आराेग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करण्याचा निर्णय एकाचवेळी झाला हाेता. दरम्यान, निलंगा विधानसभा मतदारसंघातील औराद शहाजानी आणि शिरुर अनंतपाळ येथील ग्रामीण रुग्णालयाचे प्रश्न मार्गी लागले; तर उदगीर तालुक्यातील वाढवणा येथील रुग्णालयाचा प्रश्न धूळ खात हाेता. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्यमंत्री संजय बनसाेडे यांनी पुढाकार घेत १४ काेटी २७ लाख ५९ हजार रुपयांच्या निधीला अंदाजपत्रकात मंजुरी देण्यात आली आहे. वाढवणा येथील प्रस्तावित असलेले ग्रामीण रुग्णालय ३० खाटांचे राहणार आहे. उदगीर
तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आणि लोकसंख्या असलेल्या वाढवणा गावात ग्रामीण रुग्णालय व्हावे, अशी मागणी अनेक दिवसांपासून होती. ग्रामीण भागातील लोकांना चांगल्या आरोग्य सेवा मिळाव्यात, यासाठी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न साेडविण्यासाठी पुढाकार घेतला. ग्रामीण रुग्णालयाच्या बांधकामासाठी १४ काेटी २७ लाख ५९ हजार रुपयांच्या निधीची तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आली आहे.