संभाजीराव केंद्रे महाविद्यालयातर्फे सव्वा दोन लाखांचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:20 IST2021-07-28T04:20:32+5:302021-07-28T04:20:32+5:30
२ लाख २४ हजार ५५३ रुपयांचा निधी संकलित झाला आहे. राज्य शासनाकडून कोरोना महामारीच्या निवारणार्थ करण्यात येत असलेल्या उपाययोजनांसाठी ...

संभाजीराव केंद्रे महाविद्यालयातर्फे सव्वा दोन लाखांचा निधी
२ लाख २४ हजार ५५३ रुपयांचा निधी संकलित झाला आहे.
राज्य शासनाकडून कोरोना महामारीच्या निवारणार्थ करण्यात येत असलेल्या उपाययोजनांसाठी निधी उपलब्ध व्हावा,
या हेतूने राज्य शासनाने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत ही रक्कम देण्यात आली आहे. यापूर्वीही दोन दिवसांचा पगार २०२०मध्ये देऊन महाविद्यालयाच्या वतीने हातभार लावण्यात आला होता. सामाजिक कार्यात महाविद्यालय अग्रेसर असल्याचे प्राचार्य डॉ. बी. टी. लहाने यांनी सांगितले.
२ लाख २४ हजार ५५३ रुपयांचा संकलित निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी जमा करण्यात आला आहे. उपक्रमाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मानवेंद्र केंद्रे, संस्थेचे अध्यक्ष डॉ. भागवत केंद्रे यांनी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे कौतुक केले आहे.