वीज पुरवठ्याच्या कामासाठी साडेदहा लाखांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:19 IST2021-04-04T04:19:54+5:302021-04-04T04:19:54+5:30

जळाकाेटसह वाडी-वस्तीत वीज पुरवठा करण्यासाठी विद्युत खांब मंजूर करण्यात यावेत, याशिवाय जळकाेट येथे स्ट्रिट लाइटचे फोकस बसविण्यासाठी २ लाख ...

Fund of Rs. 1.5 lakhs for power supply | वीज पुरवठ्याच्या कामासाठी साडेदहा लाखांचा निधी

वीज पुरवठ्याच्या कामासाठी साडेदहा लाखांचा निधी

जळाकाेटसह वाडी-वस्तीत वीज पुरवठा करण्यासाठी विद्युत खांब मंजूर करण्यात यावेत, याशिवाय जळकाेट येथे स्ट्रिट लाइटचे फोकस बसविण्यासाठी २ लाख ८८ हजार रुपये निधी मंजूर झाला आहे. जळकोट नगरपंचायत अस्तित्वात आल्यापासून जळकाेटमध्ये वाड्या-वस्त्या निर्माण झाल्या आहेत. अनेक ठिकाणी विजेची व्यवस्था नाही. या परिसरातील नागरिकांना वीज जाेडणी मिळणे अवघड झाले हाेते. या मागणीचा विचार करून पालकमंत्री देशमुख, राज्यमंत्री बनसोडे यांच्याकडे गटनेते महेश धूळशेट्टे यांनी मागणी केली होती. त्या मागणीची दखल घेण्यात आली असून, डीपीडीसीमधून जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सदरचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबतच्या मंजुरीचे आदेश ३१ मार्च रोजी प्राप्त झाले आहेत. सदरचा निधी मंजूर झाल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त हाेत आहे. यातून आता विजेचे खांब उभारले जाणार आहेत, असेही गटनेते धूळशेट्टे म्हणाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दस्तगीर शेख, संग्राम कदम, नितीन सोमेश्वर, मुगाबे माजीद अन्सारी, माधव धूळशेटे यांची प्रमुख उपस्थिती हाेती.

Web Title: Fund of Rs. 1.5 lakhs for power supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.