गावाला मोफत वायफाय मिळणार असल्याने त्याचा फायदा शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी व तसेच शासकीय योजनांची माहितीसाठी होणार आहे.
यावेळी जिल्हा परिषद शाळेतील मुलांना विद्यार्थ्यांच्या नावासह, फाेटोसह असलेल्या बॅगा, नवीन गणवेश, शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य रामचंद्र तिरूके, जिल्हा परिषद सदस्य प्रशांत पाटील, तहसीलदार सुरेश घोळवे, गटविकास अधिकारी मनोज राऊत, उपसभापती शंकरराव पाटील-तळेगावकर, माजी सभापती सत्यवान कांबळे, पंचायत समिती सदस्य सोमनाथ बोरोळे, भाजप तालुकाध्यक्ष काशीनाथ गरिबे, भाजयुमो तालुका अध्यक्ष रामलिंग शेरे, संगम पताळे, सौरभ नाईक, तुकाराम फावडे, भगवान माने, प्रमेश माने, पंडित पटवारी, हणमंत बिरादार, प्रशांत पाटील, बाळू पाटील, नामदेव कारभारी, नितीन कांबळे, फावडे, बाळासाहेब बिरादार, वायफाय टीमचे सुप्रिया कांबळे, प्रसाद साळुंके, शादुल शेख, राहुल राऊत, शरद कांबळे, श्रीधर वाघमारे, अमोल वाघमारे, मुख्याध्यापक गुंजरगे, सहशिक्षिका गुंगे आदींस ग्रामस्थ उपस्थित होते. यशस्वीतेसाठी राज गुणाले, पांडुरंग येलमटे आणि ग्रामसेवक श्रीकांत पताळे यांनी परिश्रम घेतले.