अस्थिरोग शिबिरात ५५ रुग्णांना मोफत औषधोपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:18 IST2021-03-22T04:18:14+5:302021-03-22T04:18:14+5:30

पालकमंत्री अमित देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शिबिराचे उद्घाटन काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष ॲड. किरण जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी महापालिकेचे ...

Free medical treatment to 55 patients in the orthopedic camp | अस्थिरोग शिबिरात ५५ रुग्णांना मोफत औषधोपचार

अस्थिरोग शिबिरात ५५ रुग्णांना मोफत औषधोपचार

पालकमंत्री अमित देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शिबिराचे उद्घाटन काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष ॲड. किरण जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी महापालिकेचे विरोधी पक्षनेते ॲड. दीपक सूळ, अभिजित देशमुख, डॉ. चेतन सारडा, प्रसाद उदगीरकर, श्याम धूत, माजी उपमहापौर कैलास कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. शिबिरात अस्थिरोग तपासणी, फिजिओथेरपी, मशीनद्वारे हाडांच्या ठिसूळपणाची तपासणी या सर्व तपासण्या मोफत करण्यात आल्या. त्याचप्रमाणे रक्ततपासणी व डिजिटल एक्स रेमध्ये रुग्णांना ५० टक्के सूट देण्यात आली. एमआरआय, सिटी स्कॅन व सोनोग्राफीवर २५ टक्के सूट देण्यात आली. रुग्णांची तपासणी डॉ. अशोक पोद्दार, डॉ. इम्रान कुरेशी, डॉ. तुषार पिंपळे यांनी केली. त्यांना डॉ. अंगिराज शेरे, डॉ. सिद्रामप्पा भोसगे, डॉ. पल्लवी जाधव, डॉ. प्रतिमा सरवडीकर, डॉ. मयूरी खोंडे यांनी सहकार्य केले.

Web Title: Free medical treatment to 55 patients in the orthopedic camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.