रेशन दुकानदारांच्या संपामुळे मोफत धान्य वितरण रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:21 IST2021-05-06T04:21:01+5:302021-05-06T04:21:01+5:30
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहून राज्य शासनाने ब्रेक द चेनअंतर्गत कडक निर्बंध लागू केले आहेत. गरीब कुटुंबांस दोन वेळचे भोजन ...

रेशन दुकानदारांच्या संपामुळे मोफत धान्य वितरण रखडले
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहून राज्य शासनाने ब्रेक द चेनअंतर्गत कडक निर्बंध लागू केले आहेत. गरीब कुटुंबांस दोन वेळचे भोजन मिळावे म्हणून अंत्योदय, अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना मोफत धान्य वितरणाचा निर्णय घेऊन त्यासंदर्भात आदेशही दिले आहेत. निलंगा तालुक्यातील निटूर, शेंद, ताजपूर, खडक उमरगा, बसपूर, मुगाव, कलांडीसह तालुक्यातील एकूण १८९ रेशन दुकानांत मोफत धान्य पोहोचले आहे. परंतु, रेशन दुकानदारांच्या संपामुळे लाभार्थ्यांना धान्याचे वितरण झाले नाही.
शासनाने रेशन दुकानदारांच्या मागण्यांचा विचार करावा. तसेच रेशन दुकानदारांनी कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन आपले आंदोलन मागे घ्यावे, अशी अपेक्षा योजनेचे लाभार्थी सुभाष वल्लेकर, युवराज कवडे, ज्ञानोबा ढोबळे, बाळू डांगे यांनी व्यक्त केली. दरम्यान, रास्त भाव दुकानदार दिलीप हरणे, मोहनराव चव्हाण, प्रदीप मरूरे, मंगेश चव्हाण, बालाजी भुरे, वसंत चव्हाण, चिऊ सोमवंशी, मोगरगे, राठोड म्हणाले, शासनाने आमच्या मागण्या मंजूर केल्याशिवाय आम्ही संप मागे घेणार नाही. आम्हाला कोरोनाची जाणीव आहे. आमचाही शासनाने विचार करावा.
लवकरच धान्य सुरळीत...
शासन स्तरावर रेशन दुकानदारांच्या प्रतिनिधी संघटनेसोबत चर्चा सुरु आहे. काही मागण्या अंशत मंजूर केल्या आहेत. केंद्र व राज्य शासनाचा हा विषय आहे. लवकरच संपावर मार्ग निघेल आणि धान्य वितरण सुरु होईल, असे तहसीलदार गणेश जाधव म्हणाले.