नेत्र शिबिरात ११० जणांची मोफत तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:58 IST2020-12-04T04:58:43+5:302020-12-04T04:58:43+5:30
उद्घाटन प्रा. सिध्दार्थ चव्हाण व डॉ. इम्रान जमादार, नेत्रतज्ज्ञ भागवत टमके, श्रीकृष्ण मुरारी यांच्या उपस्थितीत झाले. कोरोनाच्या ...

नेत्र शिबिरात ११० जणांची मोफत तपासणी
उद्घाटन प्रा. सिध्दार्थ चव्हाण व डॉ. इम्रान जमादार, नेत्रतज्ज्ञ भागवत टमके, श्रीकृष्ण मुरारी यांच्या उपस्थितीत झाले. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा शिबीर घेता आले नाही. दरम्यान, नोव्हेंबरमध्ये ७० जणांनी नेत्र तपासणी करुन त्यातील २६ जणांची मोंतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
दरम्यान, पुन्हा शिबीर घेण्यात येणार असल्याने शहरासह खेड्यापाड्यातील व वाडी- तांडा, वस्तीवरील ११० जणांनी नोंदणी केली होती. यावेळी फुलाबाई ज्ञानोबा टमके यांच्या स्मरणार्थ मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी भागवत टमके यांना उदयगिरी लॉयन्स नेत्र रुग्णालयाच्या वतीने गौरव प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.