बामणी येथे मोफत कान, नाक, घसा तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:15 IST2021-07-18T04:15:13+5:302021-07-18T04:15:13+5:30
उदगीर : येथील डॉ. धनाजी कुमठेकर व डॉ. संजय कुलकर्णी यांच्यावतीने तालुक्यातील बामणी येथे मोफत कान, नाक, ...

बामणी येथे मोफत कान, नाक, घसा तपासणी
उदगीर : येथील डॉ. धनाजी कुमठेकर व डॉ. संजय कुलकर्णी यांच्यावतीने तालुक्यातील बामणी येथे मोफत कान, नाक, घसा तपासणी शिबिर घेण्यात आले.
या शिबिराचे उद्घाटन चेअरमन काशिनाथ बिरादार यांच्या हस्ते झाले. यावेळी सरपंच प्रभावती राजकुमार बिराजदार, विमल बिराजदार, सरस्वती बिराजदार, महानंदा सावरे, प्रयागमाय कांबळे, ग्रामपंचायत सदस्य सुनील पाटील, नामदेव म्हेत्रे, दादाराव इंचुरे, ज्येष्ठ नागरिक रावण महाराज, मुरली महाराज लासुने, काशिनाथ गंगापुरे, सुज्ञान पाटील, राजू कांबळे, गणपत कांबळे, नंदकिशोर कांबळे, संयोजक राजकुमार बिराजदार, सुनील पाटील, विजयकुमार पाटील आदी उपस्थित होते. धनुरे यांनी मोफत औषधे दिली. रूग्णांची तपासणी डॉ. संजय कुलकर्णी, डॉ. धनाजी कुमठेकर, डॉ. अजित पाटील यांनी केली. त्यांना आरोग्यसेविका चिल्लरगे, आशा सेविका रूपा कांबळे यांनी सहकार्य केले.