जळकोट येथे मोफत सर्वरोग निदान व उपचाराचे महाशिबीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:34 IST2021-02-18T04:34:42+5:302021-02-18T04:34:42+5:30
शिबिरामध्ये विविध आजारांची तपासणी केली जाईल. तसेच लहान मोठ्या शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. जळकोटच्या ग्रामीण रुग्णालयाच्या बाजूला मागासवर्गीय ...

जळकोट येथे मोफत सर्वरोग निदान व उपचाराचे महाशिबीर
शिबिरामध्ये विविध आजारांची तपासणी केली जाईल. तसेच लहान मोठ्या शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. जळकोटच्या ग्रामीण रुग्णालयाच्या बाजूला मागासवर्गीय मुलींचे वसतीगृह येथे शिबीर हाेणार असल्याचे डॉ. एकनाथ माले यांनी सांगितले. कॅन्सर, हायड्रोसील, नेत्र तपासणीसह जवळपास ३४ प्रकारच्या तपासण्या केल्या जाणार आहेत. या महाआरोग्य शिबिराची जय्यत तयारी सुरू झाली असून वेगवेगळ्या समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष प्रकाश वलसे यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणीसाठी नोंदणी सुरू करण्यात आली आहे. शिबिराच्या तयारीसाठी डॉ. एकनाथ माले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, ग्रामीण रूग्णालयाचे अधीक्षक डॉ. जगदीश सूर्यवंशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय पवार, डॉ. खंडागळे, डॉ. सतिश हरिदास, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी कामाला लागले आहेत. शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.