देवणी येथे नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:22 IST2021-03-01T04:22:30+5:302021-03-01T04:22:30+5:30
भगवान गाडगेबाबा समाजसेवा सोसायटी उदगीरद्वारा संचलित बाळ भगवान निवासी अपंग विद्यालय, देवणी येथे अधीक्षक या पदावर नोकरी लावून देतो ...

देवणी येथे नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक
भगवान गाडगेबाबा समाजसेवा सोसायटी उदगीरद्वारा संचलित बाळ भगवान निवासी अपंग विद्यालय, देवणी येथे अधीक्षक या पदावर नोकरी लावून देतो म्हणून संस्थाचालक व सचिव यांनी अझरोद्दीन इकबाल परकोटे रा. तोंडार ता. उदगीर यांच्याकडून १० लाख रुपयाची मागणी केली होती. परकोटे यास अधीक्षक पदावर नियुक्ती करून, १७ जून २०१३ रोजी नोकरीवर रुजू करून घेतले. त्यातील एक लाख रुपये अप्रुव्हल काढण्यासाठी ३ मार्च २०१४ रोजी आणि दीड लाख रुपये जून २०१५ मध्ये असे एकूण अडीच लाख रुपये घेतले. मात्र, काम काही केले नाही. दरम्यानच्या काळात सदर शाळा बंद पडली. परकोटे यांनी संस्थाचालकांना संपर्क साधून थोडे थोडे करून १ लाख ९९ हजार २०० रुपये वसूल केले. मात्र उर्वरित रक्कम मिळत नसल्याप्रकरणी परकोटे यांनी उदगीर येथील न्यायालयात याचिका दाखल केली हाेती. या प्रकरणात संबंधित संस्थाचालक चंद्रकांत धोंडीबा मोरे आणि सचिव वनिता दत्तात्रय घाटे दोघेही रा. शिवशक्तीनगर उदगीर यांच्यावर फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. याप्रकरणी याचिकाकर्त्याच्या वतीने अड. एम.एन. बिरादार यांनी काम पाहिले.