जमिनीचे बनावट दस्तावेज तयार करुन फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:33 IST2020-12-05T04:33:01+5:302020-12-05T04:33:01+5:30

उदगीर शहर पोलिसांनी सांगितले, उदगीर येथील फिर्यादी विश्वनाथ संग्राम पात्रे व त्यांची आई संगुबाई यांची उदगीर येथील कायदेशीर मिळकत ...

Fraud by forging land documents | जमिनीचे बनावट दस्तावेज तयार करुन फसवणूक

जमिनीचे बनावट दस्तावेज तयार करुन फसवणूक

उदगीर शहर पोलिसांनी सांगितले, उदगीर येथील फिर्यादी विश्वनाथ संग्राम पात्रे व त्यांची आई संगुबाई यांची उदगीर येथील कायदेशीर मिळकत जमीन गट क्र.२२९/ १० क्षेत्र १ हेक्टर १० आर मिळकत गिळंकृत करण्याच्या व त्यांना या जमिनीतून बेदखल करण्याच्या हेतूने आरोपी प्रमोद अशोक कामन्ना, तलाठी शिवानंद माधवराव गुंडरे, तत्कालीन मंडळाधिकारी दिलीप शंकरराव मजगे आणि माणिक विठ्ठलराव फुलारी यांनी संगनमत करुन महसूल विभागाचे निर्णय गट क्र.२२९/०८ क्षेत्र १ हेक्टर ११ आर बाबतचे असल्याचे माहित असताना ते २२९/१० क्षेत्र १ हेक्टर १० आर यासाठी वापरुन खोटे व बनावट रेकॉर्ड तयार करुन १२ नोव्हेंबर २०१८ ते २४ जानेवारी २०१९ दरम्यान व त्यापूर्वी जमीन गट क्र. २२९/१० क्षेत्र १ हेक्टर १० आर बाबत बनावट फेरफार क्र. २९१९ हा आरोपी प्रमोद अशोक कामन्ना याची मयत आजी बकुळाबाई त्र्यंबक कामन्ना हिच्या नावे बेकायदेशीर मजकूर करुन घेतला. तसेच फिर्यादीची आई संगुबाई संग्राम पात्रे हिच्या नावे कायदेशीररित्या कोर्ट डिक्री आधारे मंजूर झालेला झालेला फेरफार क्र. १२१२ हा बेकायदेशीरितीने बनावट कागदपत्रे बनवून रद्द केला आहे. आरोपीने संगणमत करुन फिर्यादीची फसवणूक केल्याप्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात मंडळ अधिकारी, तलाठी व अन्य दोघे अशा चार जणांविरुद्ध कलम ४२०, ४६५, ४६६, ४६७, ४६८, ४७१, १६७, ३४ भादविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तीन दिवसांची पोलीस कोठडी...

याप्रकरणी पोलिसांनी तिघा आरोपींना अटक करुन न्यायालयापुढे हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. आणखीन एका आरोपीचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Fraud by forging land documents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.