४३ हजारांच्या दारूसह चारचाकी वाहन जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:20 IST2021-04-21T04:20:05+5:302021-04-21T04:20:05+5:30
उदगीर ग्रामीण पोलिसांनी सांगितले, उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी मंगळवारी पेट्रोलिंग करीत असताना हेर येथील वाघोबा चौकात एका लाल ...

४३ हजारांच्या दारूसह चारचाकी वाहन जप्त
उदगीर ग्रामीण पोलिसांनी सांगितले, उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी मंगळवारी पेट्रोलिंग करीत असताना हेर येथील वाघोबा चौकात एका लाल रंगाच्या कारमधून दारूची चोरटी विक्री सुरू असल्याची माहिती खबऱ्यामार्फत मिळाली. त्यावरून पोलिसांनी वाघोबा चौकात धाड टाकली असता एमएच ०२, बीडी ८७४२ क्रमांकाची कार आढळून आली. त्या वाहनात रमेश ऊर्फ छोटू ज्ञानोबा मस्के (रा. बाभळगाव, हमु. वडवळ, ता. चाकूर) हा आढळला. तसेच देशी दारूचे १५ बॉक्स सापडले. त्याची किंमत ४३ हजार २०० रुपये आहे. तसेच कारची किंमत १ लाख ४० हजार रुपये आहे. एकूण १ लाख ८३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल मिळाला.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल बेन यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. घारगे, पोलीस नाईक नामदेव सारुळे, पोकाॅ. राहुल गायकवाड, दयानंद सूर्यवंशी, कृष्णा पवार, संतोष शिंदे यांनी केली.