सेवालयप्रमुख रवी बापटले यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:19 IST2021-05-13T04:19:48+5:302021-05-13T04:19:48+5:30

पोलिसांनी सांगितले, फिर्यादी रविकांत बापटले हे रुग्णवाहिका क्रमांक एमएच-२४ जे-७१७७ घेऊन जात असताना आरोपींनी संगनमत करून एमएच-२४ एएफ-०९९९ या ...

Four persons have been booked in connection with the attack on Ravi Bapatle | सेवालयप्रमुख रवी बापटले यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा

सेवालयप्रमुख रवी बापटले यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा

पोलिसांनी सांगितले, फिर्यादी रविकांत बापटले हे रुग्णवाहिका क्रमांक एमएच-२४ जे-७१७७ घेऊन जात असताना आरोपींनी संगनमत करून एमएच-२४ एएफ-०९९९ या गाडीतून कत्ती, काठ्या, कुऱ्हाड काढून फिर्यादीस गच्ची पकडून जिवे मारण्याच्या उद्देशाने एकाने कत्तीने डाव्या कोपऱ्यावर जबर मारून जबरदस्तीने उचलून गाडीत टाकून अपहरण केले. यावेळी तिघांनी गाडीतील डिझेलने भरलेल्या दोन बाटल्या अंगावर टाकून आगपेटीने जाळण्याचा प्रयत्न केला, तसेच जिवे मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी सेवालयातील कर्मचारी प्रकाश आडे हे भांडण सोडविण्यासाठी आले असता एकाने त्यांच्या हातावर, पोटावर लोखंडी रॉडने जबर मारहाण केली. याप्रकरणी भीमाशंकर गुरुनाथ बावगे (रा. हासेगाव, ता. औसा) यांच्यासह चार जणांवर औसा पोलीस ठाण्यात कलम ३०७, ३६५, ३४२, ३४ भा.दं.वि.नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक शंकर पटवारी हे करीत आहेत.

Web Title: Four persons have been booked in connection with the attack on Ravi Bapatle